Chandrapur News : चंद्रपूर पोलीस ठाण्यामध्‍ये झालेल्‍या 'त्या' मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

विशेष दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 'इनक्वेस्ट'; मेडिकल बोर्डाकडून शवविच्छेदन
Chandrapur police station death
चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये विषप्राशन करून जीवन संपवलेल्या दिलीप यादव प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतली आहे. Pudhari
Published on
Updated on

Chandrapur police station death

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये विषप्राशन करून जीवन संपवलेल्या दिलीप यादव प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग केला आहे. मृत्यू प्रकरणाचा निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक तपास व्हावा, तसेच मृतकास न्याय मिळावा या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

न्यायालयीन प्रक्रियेनुसार पंचनामा

या प्रकरणात तपास प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. न्यायालयीन प्रक्रियेनुसार मृतकाचा इनक्वेस्ट पंचनामा (मरणोत्तर चौकशी) विशेष दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व देखरेखीखाली कायदेशीररीत्या करण्यात आला. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय पथकाच्या (मेडिकल बोर्ड) माध्यमातून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबींचे पालन करून पारदर्शकता राखण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

Chandrapur police station death
Verul Teacher Death : शिक्षक मृत्यू प्रकरणाचा तपास थेट 'सीआयडी'कडे वर्ग

सर्व कायदेशीर प्रक्रिया नियमानुसार राबविण्यात येणार

संपूर्ण प्रकरणाचा उच्चस्तरीय आणि निष्पक्ष तपास व्हावा यासाठी पोलीस अधीक्षकांच्या शिफारशीनंतर पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला असून, आता या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत सुरू आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणातील सर्व कायदेशीर प्रक्रिया नियमानुसार, सखोल आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असल्याचे सांगितले आहे.

Chandrapur police station death
TET Paper Leak | टीईटी परीक्षेचा पेपर फुटला : सूत्रधार फरार, शिक्षकांचा समावेश? विशेष तपास पथक चौकशी करणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news