

चंद्रपूर : काल शहरातील दोन सराफा दुकानातून सोन्याच्या ऐवजी लांबविणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी अवघ्या दोन तासांत गजाआड केली आहे. हमजा अब्दुल वहीद शेख (वय ३०) रा.अरविंद नगर चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.
काल बुधवारी चंद्रपूर शहर पो.स्टे. हद्दीत दोन सराफा दुकानात झालेल्या चोरीचे गुन्हे संदर्भात पोनि चंद्रपूर शहर यांचे नेतृत्वात सराफा दुकानदाराची फसवणुक करणाऱ्या व त्यांना चकमा देवुन सोन्याची आंगठी चोरुन त्याऐवजी नकली सोन्याची आंगठी ठेवुन पसार झालेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळुन आले. सदर रेकॉर्ड वरू आरोपीला अवघ्या दोन तासांत चंद्रपूर शहर पोलिसांनी अट्टल गुन्हेगार आरोपी हमजा अब्दुल वहीद शेख (वय ३०) रा.अरविंद नगर चंद्रपूर याला अवध्या दोन तासात अटक करण्यात आली. त्याचे कडुन दोन्ही सराफा दुकानातील चोरीस गेलेली सोन्याची आंगठी एकूण ६५,००० रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला.