Chandrapur Penganga River | पैनगंगा नदीचे पाणी झाले हिरवेगार; यापूर्वी असा प्रकार न घडल्याने नागरिकांमध्ये चिंता

कोरपना तालुक्यातील कोडशी खुर्द परिसरातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पात्रात गेल्या दोन दिवसांपासून पाणी एकदम हिरवेगार दिसू लागले
Penganga River Water Pollution Issue
नगंगा नदीच्या पात्रात गेल्या दोन दिवसांपासून पाणी एकदम हिरवेगार दिसू लागले (Pudhari Photo)
Published on
Updated on

Penganga River Water Pollution Issue

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील कोडशी खुर्द परिसरातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पात्रात गेल्या दोन दिवसांपासून पाणी एकदम हिरवेगार दिसू लागले आहे. नदीचे असे रूप यापूर्वी कधीही न पाहिल्याने नागरिक, शेतकरी आणि पर्यटकांमध्ये आश्चर्य तसेच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंद्रपूर–यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी ही जाईचा देव (अजिंठा डोंगररांगा) येथे उगम पावते व पुढे वढा येथे वर्धा नदीला मिळते. सामान्यतः स्वच्छ व पारदर्शक दिसणारे नदीचे पाणी अचानक हिरवट झाल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

Penganga River Water Pollution Issue
Chandrapur Municipal Elections | चंद्रपूर जिल्ह्यात नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात

मागील काही दिवसांतील तापमानातील बदल, पाण्याचा कमी प्रवाह, नदीत साचणारे शेवाळ अथवा एखाद्या सांडपाण्याची मिसळ यामुळे रंगबदल झाला असावा. कयास ग्रामस्थांच्या चर्चेतून व्यक्त होत आहे. मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शेतकऱ्यांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. पैनगंगा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर सिंचनासाठी वापरले जाते. “अशा प्रकारे पाण्याचा रंग बदलल्याचे आम्ही कधी पाहिले नव्हते. हे पाणी वापरण्यास सुरक्षित आहे का ” असा प्रश्न परिसरातील शेतकरी विचारत आहेत.

Penganga River Water Pollution Issue
Chandrapur Crime | चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई: बल्लारपूरच्या कुख्यात टोळीतील १० सराईतांवर 'मोक्का'

नदीतील पाण्याचे नमुने तातडीने तपासणीसाठी पाठवावेत आणि प्रत्यक्ष कारण शोधून जाहीर करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, कोडशी खुर्दजवळ नदीकाठी उत्सुकतेने गर्दी होत असून हिरवेगार पाणी पाहण्यासाठी लोकांची वर्दळ वाढली आहे.

नदीच्या पाण्यातील हा अचानक झालेला बदल पर्यावरणीय बदलाचा संकेत असू शकतो, त्यामुळे संबंधित विभागांनी तातडीने चौकशी करून अहवाल प्रसिद्ध करावा, अशी  मागणी नागरिकांनी आहे.

Penganga River Water Pollution Issue
Chandrapur Crime | १६० ग्रॅम एमडी ड्रग्ससह १६ लाखांचा मुद्देमाल जप्त : चंद्रपूर पोलिसांची ड्रग माफियांविरोधात मोठी कारवाई

संथ पाण्याचा प्रवाह असल्याने येथे शेवाळ ची वाढ झाली आहे.त्यामुळे नदीच्या पात्रातील पाण्याने हिरवा रंग धारण केला आहे.

- सुरेश चोपणे, पर्यावरण अभ्यासक, चंद्रपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news