Chandrapur Kidney Racket | परदेशात किडनी विक्री प्रकरण: मोठ्या रॅकेटचा संशय; SIT कडून कसून तपास

कर्जफेडीसाठी कंबोडियात किडनी काढल्याचे प्रकरण एकट्याचे नसून संघटित टोळी सक्रिय असल्याचे पोलिस अधीक्षकांचे संकेत
Chandrapur kidney Racket |
Chandrapur kidney Racket | किडनी विक्री प्रकरणाचा तपास वेगात : Pudhari
Published on
Updated on

Chandrapur kidney sale case

चंद्रपूर : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याला परदेशात जाऊन किडनी विकावी लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर, या प्रकरणामागे मोठे आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत असल्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हे कृत्य एका व्यक्तीचे नसून संघटित टोळीशिवाय अशक्य असल्याचे स्पष्ट संकेत चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले आहेत.

कर्जफेडीसाठी कंबोडियात जाऊन किडनी विकल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) गठित केले असून, हे पथक सध्या सक्रियपणे तपासात गुंतले आहे. या तपासादरम्यान तांत्रिक तसेच सायबर स्वरूपाच्या मोठ्या अडचणी येत असल्या तरी, त्यावर मात करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली.

Chandrapur kidney Racket |
Chandrapur District Municipal Council Election 2025: चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचा झंझावात; ११ पैकी ७ नगरपरिषद–नगरपंचायतींवर सत्ता

कंबोडियात जाऊन किडनी काढणे हे एकट्या व्यक्तीचे काम नाही. त्यासाठी संपर्क, वाहतूक, वैद्यकीय व्यवस्था आणि आर्थिक व्यवहार यांची साखळी असते. त्यामुळे या प्रकरणामागे एखादे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे आणि त्याच दिशेने तपासाची चक्रे फिरवली जात आहेत.

तक्रारदार शेतकऱ्याने दिलेल्या प्रत्येक माहितीवर काम करणे अवघड असले, तरी त्यातील प्रत्येक बाबीची शहानिशा केली जात आहे. शेतकऱ्याने ज्या-ज्या राज्यांचा उल्लेख केला आहे, त्या प्रत्येक राज्यात SIT चे पथक पाठवले जात आहे. तसेच रोशन कुळे यांच्यासोबत कंबोडियाला गेलेल्या पाच जणांशीही संपर्क साधून त्यांची चौकशी केली जाणार आहे.

Chandrapur kidney Racket |
Chandrapur kidney Racket |रोशन कुळेसह आणखी पाच जणांनी विकली किडनी ; मानवी अवयव तस्करीचे जाळे देशभर पसरल्याचे उघड

सदर शेतकऱ्याने माध्यमांशी बोलताना अनेक गंभीर बाबी उघड केल्या असल्या, तरी तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे योग्य ठरणार नाही, असेही पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. विशेष तपास पथकाचा तपास शक्य तितक्या लवकर पूर्ण करून या अमानुष मानवी अवयव तस्करीच्या जाळ्याचा पर्दाफाश करण्याचा पोलिसांचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news