Chandrapur News | घुग्घुस रेल्वे गेटवर सहनशीलतेचा अंत: महिलांचा चिमुकल्यांसह खड्ड्यातील पाण्यात उतरून आंदाेलन

पोलिस–RPF तैनात; प्रशासनाकडून फ्लायओव्हर बांधकामाचे लिखित आश्वासन
Chandrapur News
स्थानिक महिलांना चिमुकल्यांसह पाण्याने भरलेल्या खड्ड्यांत बसून रेल्वे व वेकोलि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलेPudhari Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : घुग्घुस येथील रेल्वे गेट G-39  वारंवार होत असलेल्या बंदमुळे त नागरिकांनी शनिवारी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. दुपारी १२ ते ३ या वेळेत स्थानिक महिलांना चिमुकल्यांसह पाण्याने भरलेल्या खड्ड्यांत बसून रेल्वे व वेकोलि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांचा रोष एवढा वाढला की भाजप चंद्रपूर शहराध्यक्षांच्या रुग्णवाहिकेलाही गेट पार होऊ दिले नाही. परिस्थिती तणावपूर्ण होताच घुग्घुस पोलिस व दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले. घुग्घुस परिसरातील वेकोलि कोळसा खाणींमधून दररोज हजारो टन कोळसा देश-राज्यातील वीज प्रकल्पांना पाठवण्यासाठी रेल्वे मार्गाचा वापर होतो. राजीव रतन चौकाजवळील G-39 रेल्वे गेट हा मुख्य मार्ग असून दिवसरात्र मालगाड्यांची वर्दळ असते. कोळशाच्या ओव्हरलोड गाड्यांमुळे गेट दीर्घकाळ बंद राहतो, परिणामी शाळकरी मुले, पादचारी व वाहनचालक तासन्‌तास अडकून पडतात. या गेटवर याआधीही अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत.

Chandrapur News
Chandrapur Drown News |पोहण्याची मजा जीवावर बेतली! फुटबॉल खेळून आलेल्या दोन मित्रांना जलसमाधी

घटनेदरम्यान RPF अधीक्षक बलवीर सिंह, बल्लारशाहचे अभियंता सुभोद कुमार, महारेलचे DGM पी. श्रीकांत व घुग्घुस ठाणेदार प्रकाश राऊत यांनी आंदोलनस्थळी पोहोचून नागरिकांशी चर्चा केली. आंदोलनाचं नेतृत्व माला मेश्राम यांनी केले. प्रशासनाने २६ ते २८ ऑगस्टदरम्यान रेल्वे फ्लायओव्हर ब्रिजचे काम सुरू होईल आणि पावसाळ्यानंतर पुलाखालची सर्विस रोड पूर्ण केली जाईल असे लेखी आश्वासन दिले. यापूर्वीही अशी अनेक आश्वासने देण्यात आली, पण कामाला सुरुवात झाली नाही. यावेळी जर ठरलेल्या वेळेत काम सुरू झाले नाही, तर आणखी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल अशा इशाराही दिला.

प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले
प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news