Nagbhid Tiger Captured | नागभीड तालुक्यातील सावर्ला परिसरात नर वाघ जेरबंद; गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला हलवला

मिंथुर–बाळापुर परिसरात पाच वाघांचा धुमाकूळ; वनविभागाची मोठी कारवाई
Man Animal Conflict Chandrapur
सावर्ला (तळोधी जवळ) येथे एका नर वाघाला यशस्वीरित्या जेरबंद केलेPudhari
Published on
Updated on

Man Animal Conflict Chandrapur

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील मिंथुर आणि बाळापुर परिसरात मागील काही दिवसांपासून वाघांच्या हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वनविभागाने कारवाई करत सावर्ला (तळोधी जवळ) येथे एका नर वाघाला यशस्वीरित्या जेरबंद केले.

नागभीड तालुक्यातील मिंथुर, बाळापुर आणि आसपासच्या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाच वाघांचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ल्याच्या घटनाही समोर येत असल्याने वनविभाग सतर्क झाला होता.

Man Animal Conflict Chandrapur
Chandrapur Tiger News | चंद्रपूर–मुल मार्गावर वाघाचा थरार; शिकार केलेला बैल फरपटत नेताना महामार्ग काही काळ ठप्प

या पार्श्वभूमीवर तळोधी जवळील सावर्ला परिसरात वनविभागाच्या पथकाने सापळा रचत एका नर वाघाला जेरबंद करण्यात यश मिळवले. प्रशिक्षित शुटर्सच्या मदतीने ही कारवाई पार पडली. वाघाला सुरक्षितरित्या पकडल्यानंतर त्याला ट्रॅक्टरवरून नागभीड येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले.

यानंतर पुढील प्रक्रियेसाठी वाघाला पिंजऱ्यासह मोठ्या मेटॅडोरमध्ये ठेवून नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरकडे रवाना करण्यात आले. दरम्यान, परिसरात अजूनही चार वाघांचा वावर असल्याची माहिती असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. तसेच, वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे व गस्त वाढविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news