Nagbhid Accident | नागभीडमध्ये दुचाकीची वीज खांबाला धडक; मुलाचा मृत्यू, आई गंभीर जखमी

तहसील कार्यालय रोडवरील अपघात; रात्री घरी जात असताना घडली घटना
 Accident News
Accident NewsPudhari
Published on
Updated on

Mother Son Accident Nagbhid Chandrapur

चंद्रपूर : नागभीड शहरातील तहसील कार्यालय  रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात होऊन मुलाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. ६) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मृतकाचे नाव अमोल हरिदास जीवतोडे (वय ३४, रा. नागभीड) असे आहे.

नागभीड येथील तहसील कार्यालय रोडवर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट वीज खांबाला धडकल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे.मृतकाचे नाव अमोल हरिदास जीवतोडे (वय ३४,) रा. नागभीड) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल जीवतोडे हा आपल्या आई हिरकन्या हरिदास जीवतोडे (वय ५४) यांच्यासह दुचाकीने शिवनगर येथे घरी जात होता.

 Accident News
Chandrapur Theft | डॉ. मुंधडा हॉस्पिटलमधील चोरीचा छडा; ६० हजारांची रोकड चोरणाऱ्यास अटक, एक जण फरार

दरम्यान तहसील कार्यालय  रस्त्यावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट वीज खांबाला धडकले. या धडकेत अमोल जीवतोडे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची आई हिरकन्या जीवतोडे गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news