Chandrapur BJP | चंद्रपूर महापालिकेत भाजपचा अधिकृत गट स्थापन; शेखर शेट्टी गटनेतेपदी निवड

Shekhar Shetty BJP Leader | नागपूर विभागीय कार्यालयात २४ नगरसेवकांची उपस्थिती
Shekhar Shetty BJP Leader
Shekhar Shetty BJP Leader Pudhari
Published on
Updated on

Chandrapur Municipal Corporation

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला असताना भारतीय जनता पार्टीने आपला अधिकृत गट स्थापन करत नेतृत्वाची घोषणा केली आहे. भाजपच्या २३ आणि मित्रपक्षाच्या १ अशा एकूण २४ नगरसेवकांच्या गटाच्या गटनेतेपदी शेखर शेट्टी यांची निवड करण्यात आली असून, यामुळे चंद्रपूर मनपातील भाजपची भूमिका अधिक मजबूत झाली आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने सोमवारी नागपूर येथील विभागीय कार्यालयात आपल्या अधिकृत नगरसेवक गटाची स्थापना केली. भाजपचे २३ आणि मित्रपक्षाचा १ अशा एकूण २४ नगरसेवकांचा हा अधिकृत गट असून, सर्व नगरसेवक या वेळी उपस्थित होते.

Shekhar Shetty BJP Leader
Chandrapur Congress | चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा तिढा काँग्रेस हायकमांडच्या बैठकीनंतर सुटणार

 या गटाच्या गटनेतेपदी इंडस्ट्रियल प्रभागातून विजयी झालेले नगरसेवक शेखर शेट्टी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने सहमती दर्शविल्यानंतर शेखर शेट्टी यांच्या गटनेतेपदाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

नागपूर येथील भाजप विभागीय कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अधिकृत गटाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या वेळी सर्व २४ नगरसेवकांनी एकत्र उपस्थित राहून पक्षशिस्त आणि संघटनात्मक एकजूट दाखवून दिली.

Shekhar Shetty BJP Leader
Run for Unity Chandrapur | सरदार पटेल–बिरसा मुंडा जयंतीनिमित्त चंद्रपुरात ‘रन फॉर युनिटी’

चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपकडे २४ नगरसेवकांचे संख्याबळ असून, सत्तास्थापनेसाठी भाजप सक्रिय हालचाली करत आहे. गटनेतेपदी शेखर शेट्टी यांची निवड झाल्याने आगामी सत्ता समीकरणे आणि संभाव्य युतीच्या चर्चांना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजपने अधिकृत गट स्थापन करून नेतृत्व निश्चित केल्याने मनपातील राजकीय घडामोडींमध्ये भाजप निर्णायक भूमिका बजावण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news