Chandrapur Encroachment | कोरपना - राजुरा - आदिलाबाद महामार्गावरील उड्डाणपूल अखेर अतिक्रमणमुक्त

प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची धडक कारवाई; परिसर झाला सुटसुटीत
 Korpana Rajura Adilabad Highway Flyover Encroachment
Korpana Rajura Adilabad Highway Flyover EncroachmentPudhari
Published on: 
Updated on: 

Korpana Rajura Adilabad Highway Flyover Encroachment

चंद्रपूर: कोरपना - राजुरा - आदिलाबाद या राष्ट्रीय महामार्गावरील कोरपना येथील उड्डाणपूल गेल्या अनेक दिवसांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला होता. या समस्येची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व स्थानिक प्रशासनाने मंगळवारी (दि. २९) संयुक्त धडक कारवाई करत उड्डाणपुलाखालील व परिसरातील सर्व अतिक्रमण हटवले. या कारवाईमुळे संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त झाला असून वाहतुकीसाठी सुटसुटीत व मोकळा श्वास घेणारा ठरला आहे.

उड्डाणपुलाच्या आसपास अस्ताव्यस्त पसरलेल्या अतिक्रमणामुळे या भागात सतत वाहतुकीची कोंडी होत होती, तसेच अपघाताचा धोकाही वाढला होता. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबवून संपूर्ण परिसर साफ केला.

 Korpana Rajura Adilabad Highway Flyover Encroachment
Chandrapur Drought News : चंद्रपूरला दुष्काळाची झळ; जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये 'Trigger-1' लागू, मिळणार 'या' सवलती!

ही कारवाई राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक  प्रवीण बिजेवार यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी जी. आर. कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर कौशल कुमार, जनसंपर्क अधिकारी अभिषेक दुबे तसेच कोरपना येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जमादार यांच्यासह पोलीस ताफा व प्राधिकरणाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांमधून समाधान

अतिक्रमण हटवल्याने रस्त्यावरील अडथळे दूर झाले असून वाहनधारकांनी व  नागरिकांनी या धडक कारवाईचे स्वागत केले आहे. भविष्यात पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये, यासाठी प्रशासनाने सातत्याने देखरेख ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

 Korpana Rajura Adilabad Highway Flyover Encroachment
Chandrapur News : जिल्‍हाधिकारी, सीईओंनी केले शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मार्गदर्शन

उड्डाणपूल परिसराचे होणार सौंदर्यकरण

कोरपना शहराच्या हृदय स्थानी असलेल्या उड्डाणपूल परिसराचे सौंदर्यकरण करण्यात येणार आहे. यात संपूर्ण परिसराला लोखंडी रेलिंग लावून संरक्षित करून वृक्षारोपण केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news