चंद्रपूर : गिरगाव येथील शिक्षण संस्थेतील अध्यक्षासह, सचिव आणि शिक्षिका लाच स्विकारताना रंगेहाथ

चंद्रपूर : गिरगाव येथील शिक्षण संस्थेतील अध्यक्षासह, सचिव आणि शिक्षिका लाच स्विकारताना रंगेहाथ
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : गिरगाव येथील शिक्षण संस्थेत अनुकंपा पद्धतीने कायमस्वरूपी नोकरीवर घेण्यासाठी लाच स्विकारताना शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह सचिव आणि एका प्राध्यापिकेवर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज (द. ८) ही कारवाई करत सर्वांना रंगेहाथ पकडल्याची घटना आज (दि. 8 एप्रिल) घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाचलुचपत विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल करणाऱ्या महिलेचे पती नागभिड तालुक्यातील गिरगांव येथील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे शिपाई सेवक म्हणून कार्यरत होते. मात्र त्यांच्या अचानक निधनानंतर पतीच्या जागेवर अनुकंपा तत्वाखाली मुलाला नोकरीवर घेतले. यासाठी 1 लाख रुपये तक्रारदार महिलेकडून घेतले. त्यानंतर दि.31 मार्च रोजी पुन्हा सदर महिलेस फोन करून कायमस्वरूपी नोकरीवर स्थिर करण्यासाठी 12 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. दरम्यान तक्रारदार महिलेने लाचलुचपत विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम घेताना संबंधिताना रंगेहाथ पकडले. यामध्ये महात्मा ज्योतिबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोतीराम सखाराम मोहुर्ले (वय 79) संस्थेचे सचिव मधुकर मोतीराम मोहुर्ले (वय 52) व सदर संस्था संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय व जुनिअर कॉलेजच्या शिक्षिका मंगला मधुकर मोहुर्ले (वय 50) यांना चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.

लाचलुचपत विभागाने केलेल्या या मोठ्या कारवाईनंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई ला.प्र.वि. नागपूर परीक्षेत्र नागपूरचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ला.प्र.वि चंद्रपूरच्या पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले, लाप्रविचे पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, वैभव गाडगे, अमोल सिडाम पुष्पा काचोळे, सतिश सिडाम यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news