चंद्रपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दारूबंदी, जुगार प्रतिबंध, प्रतिबंधित सुगंधी तंबाखू तसेच इतर अवैध धंद्यावर बंदी घालण्यात आली आहे. आज मंगळवारी आंतरजिल्हा सीमेवर प्रतिबंधीत सुगंधित तंबाखूने भरलेल्या ट्रकसह ३५ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
मंगळवारी (दि.२९) सावली पोलीस स्टेशन परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी गस्त घालीत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे एक पांढ-या रंगाचा ट्रकमधून महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला सुगंधित तंबाखु व पानमसाला विक्रीकरीता गडचिरोली ते चंद्रपूर मार्गाने अवैधरित्या वाहतुक करीत असल्याची माहिती मिळाली. एस.एस.टी. चेक पोस्ट व्याहाड (बु.) (ता.सावली) येथे शिवलाल भगत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक कांक्रेडवार, संतोश निंभोरकर, पोलिस शिपाई चेतन गज्जलवार, नितेश महात्मे, किशोर वैरागडे, अमोल सावे, प्रफुल्ल गारघाटे, प्रमोद डंभारे यांनी राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर येथील कर्मचाऱ्यांसह नाकाबंदी करुन नमुद संशयित वाहनाची तपासणी केली, असता त्यामध्ये तारेच्या बंडल खाली लपवून ठेवलेला महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला सुगंधित हुक्का, शिशा तंबाखू तसेच वाहन असा एकुण ३४ लाख ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पंचनामा कार्यवाही करुन जप्त केला.
आरोपी वाहन चालकांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिपक कांक्रेडवार करीत आहे. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवलाल भगत यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिपक कांक्रेडवार आणि स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली.