MCOCA Action Chandrapur | अमली पदार्थ तस्करांवर चंद्रपुरात पहिल्यांदाच ‘मोक्का’ची कारवाई

सराईत टोळीविरुद्ध पोलिसांचा दणका; २१ गंभीर गुन्ह्यांची नोंद, तिघांवर मोक्काची कलमे
 Chandrapur Drug Smugglers MCOCA
Drug Smugglers MCOCAPudhari
Published on
Updated on

Chandrapur Drug Smugglers MCOCA

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात अंमली पदार्थांची विक्री आणि शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सातत्याने सक्रिय असलेल्या सराईत टोळीविरुद्ध चंद्रपूर पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. अंमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध चंद्रपूर पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) १९९९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. रामनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तिघांसह एका पाहिजे असलेल्या आरोपीविरुद्ध मोक्काची कलमे वाढविण्यात आली आहेत.

रामनगर पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक ९८०/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क), २० (बी) (ii) (बी), २९ अंतर्गत अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील वसीमखान आरिफखान ऊर्फ कालू (४०), नसीबखान आरिफखान ऊर्फ मालू (३९), जुबेर करिम खान तसेच एका पाहिजे असलेल्या आरोपीचा समावेश आहे.

 Chandrapur Drug Smugglers MCOCA
Chandrapur Crime : चंद्रपुरात घरफोडी करणारा परप्रांतीय चोरटा एलसीबीच्या जाळ्यात, तुकूम भागातील गुन्ह्याचा उलगडा

पोलिसांच्या माहितीनुसार, या आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ तस्करीसह शरीराविरुद्ध मारामारीचे तब्बल २१ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ते पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून, त्यांची संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार करून विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांच्याकडे सादर केला.

या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांनी संबंधित गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ मधील कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) लागू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार ४ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व संबंधित आरोपींविरुद्ध मोक्काची कलमे वाढवून कायदेशीर कारवाई करण्यात आली.

 Chandrapur Drug Smugglers MCOCA
Chandrapur Crime | प्रेमविवाहाला अवघे २० दिवस; संशयाने झपाटलेल्या पतीकडून स्मशानभूमीत पत्नीवर अत्याचार

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके आणि त्यांच्या डी.बी. पथकातील पोलिस अंमलदारांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news