Chandrapur Crime | पत्रकार असल्याचा धाक दाखवत विधवा महिलेकडून लाखाची खंडणी वसूल; पत्रकारांच्या टोळीला अटक

रामनगर पोलिसांची कारवाई, वेबपोर्टल व दैनिकाचे चौघे ताब्यात, दोघांचा शोध सुरू
Chandrapur Fake Journalists Arrested
महिलेकडून लाखाची खंडणी वसूल करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली(Pudhari Photo)
Published on
Updated on

Chandrapur Fake Journalists Arrested

चंद्रपूर: पत्रकार असल्याचे सांगून शहरातील एका विधवा महिलेकडून एक लाख रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या टोळीला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी अवैध कामाच्या बातमीची धमकी देत तसेच पैसे न दिल्यास ठार करण्याची धमकी देऊन खंडणीची रक्कम उकळल्याचे चंद्रपूर पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

बुधवारी (दि. ५ ) चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिस ठाण्यात एका असहाय व विधवा महिलेने तक्रार दाखल केली. तिने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ५ ते ६ जणांचा गट तिच्या घरी येऊन स्वतःला पत्रकार असल्याचे सांगत, ती अवैध व्यवसाय करत असल्याची खोटी बतावणी केली. बातमी प्रसारित न करण्यासाठी तिच्याकडून एक लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली. तसेच पैसे न दिल्यास ठार करण्याची धमकी देखील देण्यात आली. दबाव व धमकीमुळे त्या महिलेकडून जबरदस्तीने एका लाख रुपयांची खंडणी स्वीकारण्यात आली. तक्रारीच्या आधारे रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chandrapur Fake Journalists Arrested
Chandrapur Crime | चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई: बल्लारपूरच्या कुख्यात टोळीतील १० सराईतांवर 'मोक्का'

सदर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास करून चौघांना अटक केली आहे. या प्रकरणात अन्य दोघांचा सहभाग असल्याने त्यांचाही पोलिसांनी शोध सुरू केला आहे. आरोपी हे विविध वेबपोर्टल, दैनिक न्युज पेपर व टीव्ही चॅनेलचे प्रतिनिधी/संपादक असल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपी राजु नामदेवराव शंभरकर (वय ५७), कुणाल यशवंत गर्गेलवार (वय ३७), अविनाश मनोहर मडावी (वय ३३), राजेश नारायण निकम (वय ५६) या चौघांना अटक केली आहे. संशय़ितांनी पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली आहे.

या प्रकरणात आरोपींचे आणखी दोन सहकारी असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक देवाजी नरोटे, निलेश वाघमारे व इतर पथकाने केली.

Chandrapur Fake Journalists Arrested
Chandrapur Crime | १६० ग्रॅम एमडी ड्रग्ससह १६ लाखांचा मुद्देमाल जप्त : चंद्रपूर पोलिसांची ड्रग माफियांविरोधात मोठी कारवाई

नागरिकांना आवाहन

कोणीही स्वतःला पत्रकार किंवा पोलीस असल्याचे सांगून फसवणूक, खंडणी किंवा धमकी देण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी, असे अवाहन चंद्रपूर पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news