Chandrapur News | दुष्काळी परिस्थितीत ई-पीक पाहणीसह नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी

अपर जिल्हाधिका-यांसह अधिका-यांच्या देवाडा व नागाळा येथे क्षेत्रभेटी
Crop Damage Inspection
Crop Damage InspectionPudhari
Published on: 
Updated on: 

Crop Damage Inspection

चंद्रपूर : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे त्वरीत करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहे. याच अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांनी चंद्रपूर तालुक्यातील देवाडा व नागाळा गावांना भेट देऊन ई-पीक पाहणीसह नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी क्षेत्रीय स्तरावर सुरू असलेल्या पीक पंचनाम्याच्या कामाचाही आढावा घेतला.

शेतपिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष क्षेत्रीय परिस्थिती अचूकपणे नोंदवून पीक पंचनामे तसेच ई-पीक पाहणीचे काम तातडीने आणि प्राधान्याने पूर्ण करावे. शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष आणि वस्तुनिष्ठ नोंद होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कृषी, महसूल आणि ग्राम प्रशासन विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेने संवेदनशीलपणे आणि समन्वयाने काम करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दिले.

Crop Damage Inspection
Chandrapur Drought News : चंद्रपूरला दुष्काळाची झळ; जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये 'Trigger-1' लागू, मिळणार 'या' सवलती!

देवाडा येथील शेतकरी जयराम मारुती पिपरे यांच्या गट क्र. 143 मधील कापूस पिकाची डीसीएच ॲपद्वारे ई-पीक पाहणी करण्यात आली. तसेच नागाळा (सी.) येथील शेतकरी किसन वैद्य यांच्या शेतातील कापूस, धान व भाजीपाला पिकांची पाहणी करून पाण्याच्या कमतरतेमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यात आली.

कमी पर्जन्यमानामुळे कापूस पिकामध्ये फुलगळ, पातगळ तसेच बोंडांची संख्या कमी झाल्याचे पाहणीत निदर्शनास आले. त्यामुळे कापसाच्या उत्पादकतेमध्ये सुमारे 50 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. धान पिकाची वाढही खुंटलेली दिसून आली. याशिवाय भाजीपाला, तूर व सोयाबीन पिकांच्या उत्पादकतेवरही कमी पर्जन्यमानाचा प्रतिकूल परिणाम झाल्याचे आढळून आले.

Crop Damage Inspection
Chandrapur News : जिल्‍हाधिकारी, सीईओंनी केले शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मार्गदर्शन

यावेळी उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, सहाय्यक कृषी अधिकारी, पोलीस पाटील, सर्व्हेअर तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news