Chandrapur Crime | बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत डॉक्टर महिलेची पर्स लंपास

२२ हजारांची रोकड, एटीएम-क्रेडिट कार्डसह महत्त्वाची कागदपत्रे चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
Chandrapur Crime | बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत डॉक्टर महिलेची पर्स लंपास
Chandrapur Crime | बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत डॉक्टर महिलेची पर्स लंपासpudhari photo
Published on
Updated on

चंद्रपूर : भद्रावती बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिला डॉक्टरच्या पर्सवर हात साफ केल्याची घटना घडली. नागपूरला जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करत असताना होमिओपॅथिक डॉक्टर डॉ. ममता सारडा यांच्या खांद्यावरील बॅगेची चेन उघडून पर्स चोरून नेण्यात आली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

येथील रहिवासी होमिओपॅथिक डॉक्टर डॉ. ममता सारडा या नागपूरला जाण्यासाठी बसस्थानकावर उभ्या होत्या. यावेळी बसस्थानकावर मोठी गर्दी होती. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खांद्यावरील बॅगेची चेन उघडून आत ठेवलेली पर्स लंपास केली.

चोरीस गेलेल्या पर्समध्ये सुमारे २२ हजार रुपये रोख रक्कम, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. पर्स चोरी झाल्याचे लक्षात येताच डॉ. सारडा यांनी भद्रावती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news