

चंद्रपूर : शहरातील जबरी मोबाईल चोरी, मोटार सायकल चोरी व मोबाईल चोरी अशा सलग घडलेल्या गुन्ह्यांचा चंद्रपूर शहर पोलिसांनी वेगाने उलगडा करत दोन अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकासह एका आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे. या कारवाईत एकूण १,९४,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ जुलै २०२५ रोजी फिर्यादी आपल्या पत्नीसोबत मोबाईलवर बोलत असताना, पांढऱ्या मोपेड स्कुटीवरून आलेल्या अनोळखी इसमाने त्यांचा मोबाईल हिसकावून नेला. यावरून पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर गुन्हा नोंद करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन शेख राजा अमन कुरेशी (वय २०, रा. बगडखिडकी, चंद्रपूर) यास अटक केली. त्याच्याकडून मोबाईल (७,०००) व गुन्ह्यात वापरलेली स्कुटी MH 34 AB 2452 (किंमत ५०,000 )असा एकूण ५७,००० किमतीचा माल जप्त करण्यात आला.
चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनला नोंदलेल्या मोटार सायकल चोरीच्या विविध गुन्ह्यांमध्ये दोन अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. बाबुपेठ येथील विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून दोन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. (किंमत 65 000) असा एकूण १,१०,००० मुद्देमाल जप्त करण्यात आला. घुटकाळा वार्ड मधील विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून जप्त दोन मोबाईल जप्त करण्यात आले.
पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके (पोस्टे. चंद्रपूर शहर) यांच्या नेतृत्वात सपोनि. राजेंद्र सोनवणे, पोउपनि. दत्तात्रय कोलते, पोउपनि. विलास निकोडे तसेच डी.बी. पथकातील भावना रामटेके, सचिन बोरकर, संजय धोटे, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, कपुरचंद खरवार, रूपेश पराते, विक्रम मेश्राम, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, प्रफुल भैसारे, सारिका गौरकार, दीपिका झिंगरे यांनी केली. विशेष मेहनत घेतली.