Chandrapur Crime | चंद्रपुरात ३.५५ लाखांची मेफेड्रोन पावडर जप्त, आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची सापळा कारवाई
Chandrapur Crime | चंद्रपुरात ३.५५ लाखांचा  मेफेड्रोन पावडर जप्त, आरोपी जेरबंद
Chandrapur Crime | चंद्रपुरात ३.५५ लाखांचा  मेफेड्रोन पावडर जप्त, आरोपी जेरबंद
Published on
Updated on

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या विक्रीवर लगाम घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. जलनगर वार्ड येथील एका आरोपीकडून मेफेड्रोन (एम.डी.) ड्रग्ज पावडर जप्त करत त्याला अटक करण्यात आली असून सुमारे ३.५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आज शुक्रवारी (२० मार्च २०२६) रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना माधव नारायण मामीड (वय ३६), रा. सपना टाकीज मागे, जलनगर वार्ड, चंद्रपूर हा व्यक्ती रामाळा तलाव रोड परिसरात मेफेड्रोन (एम.डी.) ड्रग्ज पावडर विक्रीसाठी येणार असल्याची  गोपनीय माहिती मिळाली. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामाळा तलाव रोड येथील मनपा ओपन गार्डन परिसरात सापळा रचला. काही वेळातच संशयित व्यक्ती तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ५५.०९ ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) ड्रग्ज पावडर आढळून आली. या कारवाईदरम्यान आरोपीकडून एक जुनी वापरती सिल्वर रंगाची ज्युपीटर कंपनीची मोपेड (क्रमांक MH 34 BN 4861) देखील जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्ज आणि वाहनासह एकूण सुमारे ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणी आरोपी माधव नारायण मामीड याच्याविरुद्ध चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, दिपक डोंगरे, इम्रान खान, सचिन गुरनुले, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार आणि अजित शेंडे यांनी ही कारवाई पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news