chandrapur crime : भरदिवसा घरफोडीचा थरार! चोरट्याला रोखणाऱ्या तरुणीवर हल्ला

तरुणीला घरात कोंडून चोरटा मुद्देमाल घेऊन फरार; दत्त मंदिर वॉर्डातील घटनेने खळबळ
chandrapur crime : भरदिवसा घरफोडीचा थरार! चोरट्याला रोखणाऱ्या तरुणीवर हल्ला
Published on: 
Updated on: 

चंद्रपूर : वरोरा शहरातील दत्त मंदिर वॉर्ड, मोहबाळा रोड परिसरात बावणे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे भरदिवसा घरफोडीची धक्कादायक घटना घडली. घरात चोरी करत असलेल्या चोरट्याला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीवर चोरट्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर तरुणीला घरातच कोंडून चोरटा चोरीचा मुद्देमाल घेऊन पसार झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दत्त मंदिर वॉर्डातील ब्रह्मदेव महादेव उरकांडे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरात प्रवेश केला. घरातील साहित्याची तपासणी करून चोरी करत असताना कु. प्राची ब्रह्मदेव उरकांडे हिची चोरट्याशी गाठ पडली. प्राचीने धाडसाने चोरट्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्याने तिच्यावर हल्ला करून तिला घरातच कोंडले आणि चोरीचा मुद्देमाल घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाला सुरुवात केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, त्याआधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भरवस्तीत आणि वर्दळीच्या परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा नेमका तपशील तपासानंतर स्पष्ट होणार आहे. अज्ञात चोरट्याचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news