Chandrapur crime: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन आरोपी अटकेत, १.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली
Crime  News
Crime News pudhari
Published on
Updated on

चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने तसेच मोटारसायकल असा एकूण सुमारे १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील दोन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंगदरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे तनवीर कदीर बेग (वय २३, रा. भंगाराम वॉर्ड, चंद्रपूर) आणि शिवम उर्फ कट्टया अनिल कुडकेलवार (वय २६, रा. भंगाराम वॉर्ड, चंद्रपूर) यांना ताब्यात घेण्यात आले. पुढील चौकशीत आरोपींकडून अंदाजे १,२५,००० रुपयांच्या किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच जुनी वापरलेली हिरो स्प्लेंडर प्रो मोटारसायकल जप्त करण्यात आली.

या कारवाईमुळे चंद्रपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील लक्ष्मीनगर आणि कन्नमवार नगर येथील दोन गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news