Chandrapur Crime : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या १२ हायवांवर कारवाई; साडेतीन कोटींचा मुद्देमाल हस्तगत

महसूल पथकाची मोठी कारवाई
Illegal Sand Mining
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या १२ हायवांवर कारवाई
Published on: 
Updated on: 

चंद्रपूर : अवैध आणि क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात चंद्रपूर महसूल प्रशासनाने रविवारी (दि.२८) रात्री धडक कारवाई केली. चंद्रपूर मुख्यालय ते मूल मार्गावर करण्यात आलेल्या या कारवाईत विविध जिल्ह्यांतील तब्बल १२ हायवा ट्रक जप्त करण्यात आले. या वाहनांकडे वाहतूक पास किंवा परवाना नसल्याचे तसेच वाहनांच्या क्षमतेपेक्षा अधिक गौण खनिजाची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. या कारवाईत सुमारे ३ कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, संबंधितांवर सुमारे ३५ लाख रुपयांचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.

महसूल प्रशासनाकडून अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर मुख्यालय ते मूल मार्गावर रविवारी रात्रीच्या सुमारास वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी क्षमतेपेक्षा अधिक गौण खनिज वाहून नेणारे १२ हायवा ट्रक आढळून आले. तपासणीदरम्यान काही वाहनांकडे आवश्यक वाहतूक पास अथवा परवाना नसल्याचेही समोर आले.

कारवाईनंतर सर्व १२ हायवा ट्रक जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहेत. जप्त वाहनांमुळे तहसील कार्यालय परिसरात हायवांची रांग लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जप्त करण्यात आलेल्या वाहनांतील गौण खनिजाचे मोजमाप करण्यात आले असून, त्यानुसार पुढील दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

याबाबत तहसीलदार विजय पवार यांनी सांगितले की, क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या १२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. ही वाहने तहसील कार्यालयात लावण्यात आली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून त्यांचे मोजमाप करण्यात आले आहे. मोजमापानुसार संबंधित वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news