Chandrapur Congress | चंद्रपूरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाला गटनेत्यांकडून केराची टोपली

या प्रकारामुळे काँग्रेसमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे
Congress News
Congress NewsPudhari
Published on
Updated on

चंद्रपूर : महानगरपालिकेत काँग्रेस पक्षांतर्गत असलेला अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून, थेट प्रदेश नेतृत्वाच्या आदेशांना आव्हान देण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः फोन करून दिलेल्या सूचनांना गटनेते राजेश अडूर यांनी केराची टोपली दाखविल्याचा प्रकार समोर आला आहे. 

चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या ७ जागांसाठी नुकत्याच निवडी पार पडल्या. या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गटनेते राजेश अडूर यांना स्पष्ट आदेश दिले होते. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करून शहर जिल्हाध्यक्षांमार्फत अधिकृत नावेही पाठवण्यात आली होती. मात्र, राजेश अडूर यांनी या सर्व नावांना डावलून पक्षशिस्तीचा जाहीर लिलाव केला.

राजेश अडूर यांनी वरिष्ठांनी सुचवलेली नावे बाजूला सारून स्वतःच्या मर्जीतील नावे सादर केल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे काँग्रेसमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, जिल्हाध्यक्ष संतोष लहामगे यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. अडूर यांची गटनेते पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. आता प्रश्न असा निर्माण होत आहे की, चंद्रपूर काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या शब्दाला काही किंमत उरली आहे का? आणि पक्षविरोधी कृत्य करणाऱ्या राजेश अडूर यांच्यावर प्रदेश नेतृत्व काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news