

चंद्रपूर : नागभिड-तळोधी महामार्गावरील चिंधिचक बसस्थानक परिसरात काल दुपारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. फार्चुन गाडीने दिलेल्या जोरदार धडकेमुळे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला तात्काळ उपचारासाठी ब्रम्हपुरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चिंधीचक येथे हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागभिड-तळोधी महामार्गावरील चिंधिचक बसस्थानकावरून चिंधीचक गावाकडे दुचाकीस्वार मोरेश्वर काशिनाथ सापतैसे हे . एमएच ३४-बीटी ०५५४ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. दरम्यान मागून आलेल्या फार्चुन वाहन (क्र. एमएच ३१-एफबी ३३७७) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत चिंधिचक निवासी मोरेश्वर काशिनाथ सातपैसे (वय ५५) गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले, त्यांच्यावरउपचार सुरू असताना आज गुरूवारी पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
नागाभीड तालुक्यातील चिंधिचक बसस्थानक हे नेहमीच गजबलेले असते. येथून किटाळी बोर., मांगरुड, खडकी, हुमा, गोविंदपूर, सोनापू, नेरी मार्गे चिमूर अशी वाहतून असते. शिवाय या परिसरातील उपरोक्त गावातील नागरिकांचे नागभीड येथे दैनंदिन जाणे येणे असते. तसेच शालेय विद्यार्थी सकाळी दुपार पाळीमध्ये याच मार्गान विद्यार्थी नागभीड ला ये जा करता. त्यामुळे या बसस्थानकावर रेलचेल असते. याच बसस्थानकावर काही महिण्यापूर्वी चिधिंमाल येथील एका विद्यार्थ्यांचा असाच पध्दीने अपघात होऊन जिव गेला होता. यापूर्वीवही या ठिकाणी वारंवार अपघात घडले आहेत.
वर्षभरापूर्वीच नागभीड तळोधी, सिंदेवाही मुल चंद्रपूर मार्गोचे रस्त्याचे काम झाले आहे. रस्ता रूंद व डांबकरीरण करण्याचे आल्याने या मार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची वाहन चालविण्याची गती वाढली आहे. वाढलेल्या गतीमुळे चिंधीचक बसस्थानकावर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे चिंधीचक बसस्थानकावर तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांसह चिंधीचक ग्राम पंचातयीचे उपसरपंच प्रदीप समर्थ यांनी केली आहे.