Chandrapur Leopard Death | उपचारादरम्यान जखमी बिबट्याचा मृत्यू; वृद्धत्वामुळे शिकार करण्याची क्षमता कमी झाल्याचा अंदाज

चिमूर वनपरिक्षेत्रातील खडसंगी नियतक्षेत्रातील नवेगाव परिसरात गंभीर जखमी अवस्थेत बिबट्या आढळला
Chimur Forest Range Leopard Death
Chimur Forest Range Leopard DeathPudhari
Published on
Updated on

Chimur Forest Range Leopard Death

चंद्रपूर : चिमूर वनपरिक्षेत्रातील खडसंगी नियतक्षेत्रातील नवेगाव परिसरात गुरुवारी (दि.६) सकाळी गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वन विभागाच्या तातडीच्या प्रयत्नांनंतरही त्याला वाचविणे शक्य झाले नाही.

सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नवेगाव परिसरात बिबट्या गंभीर जखमी अवस्थेत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि मानद वन्यजीव रक्षकांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुरक्षित ताब्यात घेतले. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले; मात्र सकाळी सुमारे नऊ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Chimur Forest Range Leopard Death
Chandrapur Ashram school abuse: चंद्रपूर हादरले! आश्रमशाळेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर अश्लील व्हिडीओ दाखवून लैंगिक अत्याचार

वन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, मृत बिबट्याचे वय अंदाजे १० ते ११ वर्षे होते. वृद्धत्वामुळे त्याची शिकार करण्याची क्षमता कमी झाली असावी, त्यामुळे त्याची प्रकृती खालावल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आले असून आवश्यक जैविक नमुने रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होणार आहे. शवविच्छेदनानंतर वन विभागाच्या उपस्थितीत नियमानुसार बिबट्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

या संपूर्ण कारवाईवेळी ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक एस. आर. कुमारस्वामी, सहायक उपवनसंरक्षक अरविंद जे., मानद वन्यजीव रक्षक अमोद गौरकर, सहाय्यक आयुक्त (पशुधन) डॉ. राहुल शेंदरे, डॉ. ओवाड, डॉ. माधवी गोंगले, चिमूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर तसेच वन विभागाचे अजय नेरलवार, संजय पाटील, सुमित जाधव, रुपेश केदार, अमोल नेवारे आणि विशाल सोनुने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news