चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 3 कोटी 70 लाख रुपयांवर सायबर गुन्हेगारांचा डल्ला

Chandrapur News | 1 कोटी 31 लाख रुपये वाचविण्यात सायबर पोलिसांना यश
Chandrapur News
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकPudhari Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 3 कोटी 70 लाख रुपयांवर सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारला आहे. 7 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत अनेक ट्रांजेक्शन सायबर गुन्हेगारांनी दिल्ली आणि नोएडा येथील बँक खात्यांवर वळते करत बँकेच्या सायबर सुरक्षेला धक्का दिला आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून RTGS केलेली रक्कम नागपूर येथील येस बँक च्या माध्यमातून लाभार्थी खात्यात जमा होते. 7 आणि 10 फेब्रुवारी या दोन दिवसात 34 खातेदारांच्या खात्यामधून ही रक्कम RTGS करण्यात आली होती. या प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती बँक "मेकर आणि चेकर" तर येस बँक बेनिफिशरी बँक आहे. मात्र आरटीजीएस केलेली रक्कम संबंधित खात्यांमध्ये जमा न झाल्याने व्यवस्थापनाला संशय आला.  चंद्रपूर येथील रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल ११ फेब्रुवारी, २०२४ रोजी चंद्रपूर जिल्‍हा बँक CDCC चंद्रपूर येथील माहिती व तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी पोलीस स्टेशन रामनगर येथे तक्रार आहे. तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार अज्ञात सायबर गुन्हेगारांनी दिनांक 7 ते 10 फेब्रुवारी 2025 या कालावधीत बँकेची आर्थिक व्यवहाराची ऑनलाईन प्रक्रिया हॅक केली.व रक्‍कम लंपास केली असे म्‍हटले आहे.

तत्पूर्वी सदर प्रकरणी संबंधीत बँक अधिकारी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पो.स्टे. ला माहिती दिल्यावरुन वरून 10 फेब्रुवारी 2025 रोजी नॅशनल सायबर गुन्हे रिपोर्टीग पोर्टलवर त्यांची तक्रार नोंदवुन झालेल्या एकूण ३३ ट्रॉन्झेक्शनवर फ्रिज लावण्यात आल्याने बँकेला ६० लाख ६४हजार ५८२ रुपये परत जमा झाली आहे. ७१लाख ३४ हजार ७३७ रुपये विविध बँक अकॉऊन्टला होल्ड करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत १ कोटी ३१लाख ९९ हजार ३१९ रुपये वाचविण्यास चंद्रपूर पोलीसांना यश आली आहे. उर्वरीत रक्कमे बाबत संबंधीत बँकशी पत्रव्यवहार करुन बँकेची आयटी टिम, सायबर टिम आणि पोस्टे रामनगर तपास पथक गुन्ह्याचा सखोल व तांत्रिक तपास करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news