Chandrapur Accident | नेरी-शिरपूर मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

चारचाकीची जोरदार धडक; दुचाकीचा समोरील भाग चकनाचूर, पोलिसांकडून तपास सुरू
Chandrapur Accident
Chandrapur Accident
Published on
Updated on

चंद्रपूर : नेरी-शिरपूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अर्जुन अंबादास शिंदे (वय ४०)  रा. पिंपळशेंडा, जि. यवतमाळ असे मृतकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेरी-शिरपूर रोडवर MH 36 AL 5074 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने MH 29 CK 0137 क्रमांकाच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीच्या समोरील भागाचा पूर्णपणे चकनाचूर झाला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले.

अपघातात अर्जुन शिंदे गंभीर जखमी झाले होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातानंतर काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता. पोलिसांनी संबंधित वाहन ताब्यात घेतले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news