Chandrapur Accident |रस्त्‍यावर उभ्या नादुरुस्त ट्रकला दुचाकीची मागून धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

नागभीड-तळोधी बाळापूर मार्गावरील चिंधीमाल फाट्याजवळील घटना; मांगरूळ गावावर शोककळा
मृत तरुण शेखर आबाजी भजनकर
मृत तरुण शेखर आबाजी भजनकर
Published on
Updated on

चंद्रपूर : नागभीड-तळोधी बाळापूर मार्गावरील चिंधीमाल फाट्याजवळ पंजाबी ढाब्याच्या परिसरात नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. शेखर आबाजी भजनकर (वय ३७) रा. मांगरूळ असे मृताचे नाव आहे. शनिवारी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.

शेखर भजनकर हे नागभीड येथून आपल्या मूळ गावी मांगरूळ येथे जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. चिंधीमाल फाट्याजवळील पंजाबी ढाब्याजवळ आल्यानंतर रस्त्यावर नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकवर त्यांची दुचाकी मागून आदळली. धडक एवढी जोरदार होती की, शेखर गंभीर जखमी झाले. त्यांच्या दुचाकीवर मागे बसलेली व्यक्तीही किरकोळ जखमी झाली.

मृत तरुण शेखर आबाजी भजनकर
Chandrapur Crime | वरोरा तालुक्यातील बकरे चोरीचा २४ तासांत पर्दाफाश; तिघे आरोपी जेरबंद

अपघातानंतर ढाब्याजवळील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. शेखर यांना उपचारासाठी नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. अपघाताचे नेमके कारण आणि नादुरुस्त ट्रक रस्त्यावर कोणत्या परिस्थितीत उभा होता, याबाबत तपास सुरू आहे.

शेखर भजनकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मांगरूळ गावात शोककळा पसरली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news