

Chandrapur Earthquake :
चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा :
आज गुरुवारी सकाळच्या सुमारास जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मार्डा, एकोना परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सौम्य धक्के असल्यामुळे याची कोणालाही जाणवले नाही. मात्र त्याची भूकंप ॲपच्या माध्यमातून नोंद घेण्यात आली आहे. 3.2 रिश्टर तीव्रतेची नोंद घेण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका परिसर असल्याचे ॲपद्वारे नोंदविण्यात आले.
तथापि, या घटनेबाबत मार्डा व एकोना गावातील नागरिक, तसेच पोलीस पाटील आणि तलाठी यांच्याकडून खात्री केली असता कोणालाही भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय, परिसरातील वेकोली खदान व्यवस्थापनाकडूनही सदर घटनेची खात्री करण्यात आली असून कोणतेही अनिष्ट परिणाम झाल्याचे निदर्शनास आलेले नाहीत.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून प्राप्त माहितीनुसार, सध्या तरी या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची नोंद नाही. प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.