Car Hit Tiger In Chandrapur: नागपूर - सिंदेवाही मार्गावर कारची वाघाला जोरदार धडक; वाघ गंभीर जखमी : वनविभागाकडून रेस्क्यू

शार्पशूटरच्या मदतीने बेशुद्ध करून उपचारासाठी नागपूरला रवाना, रस्त्यावर बघ्यांची गर्दी
Car Hit Tiger In Chandrapur: नागपूर - सिंदेवाही मार्गावर कारची वाघाला जोरदार धडक; वाघ गंभीर जखमी : वनविभागाकडून रेस्क्यू
Published on: 
Updated on: 

Car Hit Tiger In Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना सुरू असतानाच सिंदेवाही-नागभीड राज्यमार्गावर एका पट्टेदार वाघाचा भीषण अपघात झाला आहे. रस्ता ओलांडत असताना अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत सुमारे तीन वर्षांचा नर वाघ गंभीर जखमी झाला. घटनेनंतर झुडपात जाऊन लपलेल्या वाघाला वनविभागाच्या पथकाने शार्पशूटरच्या मदतीने बेशुद्ध करून सुरक्षितरीत्या जेरबंद केले. पुढील उपचारासाठी त्याला नागपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये रवाना करण्यात आले आहे.

Car Hit Tiger In Chandrapur: नागपूर - सिंदेवाही मार्गावर कारची वाघाला जोरदार धडक; वाघ गंभीर जखमी : वनविभागाकडून रेस्क्यू
Chandrapur Crime News : निर्घृण हत्येने चंद्रपूर हादरले! इंदिरा गांधी चौकात शीर, रेल्वे उड्डाणपुलाखाली धड

सिंदेवाही शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या खातगाव (भेंडाळा) फाट्यानजीक आज गुरुवारी (दि. १९) दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. नागभीडकडून सिंदेवाहीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या पट्टेदार वाघाला जोरदार धडक दिली. या धडकेत वाघाच्या कमरेला गंभीर दुखापत झाली.

Car Hit Tiger In Chandrapur: नागपूर - सिंदेवाही मार्गावर कारची वाघाला जोरदार धडक; वाघ गंभीर जखमी : वनविभागाकडून रेस्क्यू
Chandrapur Loan Recovery | कर्ज हप्त्याच्या थकबाकीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी घरातून नेली चिमुकल्याची सायकल

अपघातानंतर जखमी वाघ रस्त्यालगतच्या झुडपात जाऊन लपून बसला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. त्यामुळे सिंदेवाही-नागभीड राज्यमार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सिंदेवाहीच्या पोलीस निरीक्षक लता वाढीवे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार (बोरावार) यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांची गर्दी हटविली आणि वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून वाघाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम हाती घेतली. शार्पशूटर अजय मराठे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत सावधगिरीने जखमी वाघाला बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करून पुढील उपचारासाठी नागपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरकडे रवाना करण्यात आले.

नागरिकांच्या गर्दीमुळे बचावकार्यात अडथळे

जखमी वाघाला पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. काही नागरिकांच्या आरडाओरडीमुळे बचाव मोहिमेत अडचणी निर्माण झाल्या. वन्यप्राण्यांच्या बचावकार्यात नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये, आरडाओरड टाळावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वनविभाग व पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले.

दोन जणांचा बळी घेणारा तोच वाघ?

गेल्या महिनाभरात पळसगाव (जाट) आणि भेंडाळा परिसरात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर अपघातात जखमी झालेला वाघ हाच त्या दोन्ही घटनांमधील हल्लेखोर वाघ आहे का, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, या वाघाची ओळख आणि त्याचा पूर्वीच्या हल्ल्यांशी असलेला संबंध अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे वनविभागाच्या पुढील तपासाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.