Brahmapuri Hospital Sealed | मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर ३ रुग्णांची दृष्टी गेल्याने खळबळ: ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटल सील; अनियमितता उघडकीस

‘बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट 1949’ व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे उल्लंघन
Khristanand Hospital Case
Khristanand Hospital CasePudhari
Published on
Updated on

Khristanand Hospital Case

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात आरोग्य व्यवस्थेतील गंभीर निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, ख्रिस्तानंद हॉस्पिटलवर प्रशासनाने मोठी कारवाई करत ऑपरेशन थिएटरसह काही महत्त्वाचे विभाग सील करण्यात आले. मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर तीन रुग्णांची दृष्टी गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. मात्र शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतच रुग्णांना गंभीर स्वरूपाचा जंतूसंसर्ग झाला. परिस्थिती इतकी बिघडली की तीन रुग्णांना आपली दृष्टी गमवावी लागली. या प्रकाराची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सकांकडे करण्यात आली होती.

Khristanand Hospital Case
Chandrapur News | राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या विशेष निरीक्षकांकडून सामूहिक वनहक्क क्षेत्रांची पाहणी

या गंभीर घटनेची दखल घेत आरोग्य प्रशासनाने तातडीने विशेष चौकशी समिती नियुक्त केली. समितीने रुग्णालयाची पाहणी करून प्राथमिक अहवाल सादर केला. या अहवालात अनेक गंभीर त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन स्पष्टपणे समोर आले. चौकशीदरम्यान उघड झाले की, रुग्णालयात स्वतंत्र नेत्ररोग खाटा मंजूर नसतानाही अवैधरित्या नेत्र शस्त्रक्रियागृह चालविले जात होते. तसेच ‘बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट 1949’ मधील नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन करण्यात आले होते. याशिवाय, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या आरोग्य मानकांचेही पालन करण्यात आले नव्हते.

या सर्व गंभीर बाबी लक्षात घेता जिल्हा शल्य चिकित्सकांनी तात्काळ कठोर पावले उचलत रुग्णालयाची नोंदणी रद्द केली. तसेच ऑपरेशन थिएटरसह महत्त्वाचे विभाग सील करण्यात आले आहेत. पुढील चौकशी सुरू असून दोषींवर कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Khristanand Hospital Case
Chandrapur News | ‘मंड्या’ तण नियंत्रणासाठी कृषी विभाग सज्ज; चिंधीचक परिसरात वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञांची भेट

दरम्यान, ख्रिस्तानंद मिशनरीतर्फे चालविण्यात येणारे हे रुग्णालय अल्पदरात सेवा देत असल्यामुळे परिसरातील नागरिकांचा त्यावर मोठा विश्वास होता. आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, शस्त्रक्रिया किंवा उपचार घेताना संबंधित रुग्णालयाची मान्यता व सुविधा तपासून घेण्याचा सल्ला दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news