चंद्रपूर : घराचा दरवाजा उघडताच महिला 20 फूट खोल खड्डयात पडली

चंद्रपुरातील रयत्तवारी कॉलरीतील धक्कादायक घटना
Chandrapur Landslide News
चंद्रपुरामध्ये घरात पडलेला खोल खड्डाPudhari Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : शहरातील रय्यतवारी कॉलरीतील एका घरात दरवाजा उघडताच एक महिला 20 फूट खोल खड्यात पडली. गावावरून दोन दिवसानंतर घरी परतलेल्या शिवणकर यांच्या घरी गुरूवारी (दि.1) धक्कादायक घटना उघडकीस आली. या मध्ये एक महिला जखमी झाली असून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चंद्रपूर शहराच्या रय्यतवारी कॉलरी भागात शिवणकर हे निवासी आहेत. दोन दिवसांपूर्वी ते कुटुंबिय गावी गेले होते. रयतवारी कॉलरी परिसराच्या सभोवती कोळसा खाणी आहेत. याचं परीसरात त्यांचे घर आहे. दोन दिवसानंतर शिवणकर गुरुवारी (दि.1) घरी परत आले. दुपारच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांचे कुटुंबातील महिलेने दरवाजा उघडला. आत मध्ये प्रवेश करतात थेट वीस फूट खोल खड्ड्यात अचानक महिला पडली. या प्रकारामुळे कुटुंबियांनाही काही कळले नाही. प्रचंड तारांबळ उडाली. शेजाऱ्याना बोलावून शिडीच्या सहाय्याने महीलेला बाहेर काढण्यात आले.

यानंतर तिला रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. मागील दहा ते पंधरा दिवसापासून चंद्रपूर शहर जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे कोळसा खाणीमुळे पोकळ झालेला घरातील भूभागाचे भूस्खलन झाले. त्यामुळे हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर पोलीस आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोचले. सदर घरात पडलेला खड्डा हा भूस्खलनातून पडला किंवा अन्य प्रकारातून याचा तपास अधिकारी करीत आहेत. चंद्रपूर शहराला लागुन असलेल्या घुग्गुस शहरात 26 ऑगस्ट 2022 रोजी आमराई वार्डात अशाच प्रकारे एक घर सुमारे 70 फूट खाली आतमध्ये खचले होते. कोळसा काढून पोकळ झालेला भूभाग सुयोग्य पद्धतीने पुन्हा रेती भरून बुजविल्या न गेल्याने अशा पद्धतीने भूभागात खड्डे पडण्याचे प्रकार होत असल्याची माहिती आहे. वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेडचे तज्ञ यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भूसखलनामुळे रयतवारी कालरी परिसरात नागरिकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news