Chandrapur Politics | फॉर्महाऊस कांडात ५० लाख देऊन सुटलात, मुलगा ड्रग्जमधून १० लाख देऊन सोडवला: अजय सरकार यांचा आमदार जोरगेवार यांच्यावर हल्लाबोल

Chandrapur Municipal Corporation Election | चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधून उमेदवारी जाहीर झालेल्या अजय सरकार यांचे तिकीट अखेर भाजपकडून कापण्यात आले.
Ajay Sarkar vs MLA Kishore Jorgewar
Ajay Sarkar vs MLA Kishore Jorgewar Pudhari
Published on
Updated on

Ajay Sarkar vs MLA Kishore Jorgewar

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधून उमेदवारी जाहीर झालेल्या अजय सरकार यांचे तिकीट अखेर भाजपकडून कापण्यात आले. वीसहून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाल्याची माहिती आहे. मात्र तिकीट कापल्यानंतर संतापलेल्या अजय सरकार यांनी थेट आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर गंभीर आरोपांची मालिका करत राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. जोरगेवार यांनीच त्यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने तिकीट कापण्यात यश मिळवल्याचा दावा सरकार यांनी केला असून, त्यानंतर त्यांनी ‘फॉर्महाऊस कांड’, ‘ड्रग्स प्रकरण’ आणि ‘कौटुंबिक नैतिकते’शी संबंधित आरोपांचा स्फोट केला आहे.

चंद्रपूर शहरात भाजपच्या उमेदवारीवरून सकाळपासून सुरू असलेला वाद आणखी तीव्र झाला आहे. भाजपने प्रभाग क्रमांक ४ मधून घोषित केलेले उमेदवार अजय सरकार यांचे तिकीट कापल्याची अधिकृत माहिती समोर येताच, अजय सरकार यांनी पत्रकार परिषद घेत आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली.

Ajay Sarkar vs MLA Kishore Jorgewar
Chandrapur Political Clash | गडचांदूरमध्ये तणाव: भाजप उमेदवाराने राष्ट्रवादी उमेदवाराच्या भावावर फेकली वीट; रुग्णालयात दाखल

“मला क्रिमिनल म्हणण्याआधी तुमचे कांडही तपासा,” असा थेट हल्ला करत सरकार म्हणाले, “१० वर्षांपूर्वी तुम्ही फॉर्महाऊसवर कसे पकडले गेले आणि ५० लाख रुपये देऊन कसे सुटलात, हे मला माहिती आहे.” याशिवाय त्यांनी जोरगेवार यांच्या मुलावरही गंभीर आरोप करत, “ड्रग्स प्रकरणात मुलगा सापडल्यावर १० लाख देऊन त्याला कसे सोडवले, रात्री कोणत्या मुलींना घेऊन जातो, हेही मला माहित आहे,” असा गौप्यस्फोट केला.

आपल्यावरील गुन्ह्यांबाबतही त्यांनी स्पष्टीकरण देत, “माझ्यावर ३३ गुन्हे दाखल आहेत, पण ते सर्व राजकीय स्वरूपाचे आहेत,” असे सांगितले. “मी  जोरगेवार यांची सेवा करत होतो, तेव्हा गुन्हेगार नव्हतो. आज तिकीट द्यायची वेळ आली, तर गुन्हेगार झालो काय?” असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.

Ajay Sarkar vs MLA Kishore Jorgewar
Chandrapur politics | भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश महामंत्री जुनेद खान यांचा राजीनामा; काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपच्या तिकीट कापण्यामागे पुढील कारणे चर्चेत

◾अजय सरकार यांच्यावर खून, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचा दावा

◾मुख्यमंत्र्यांच्या सभेला विरोध करत सभा उधळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला.

◾मुख्यमंत्रीविरोधी कॅम्पेन करणाऱ्या मनोज पोतराज यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्याने जनभावना तीव्र

◾प्रभागात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष

या आरोप-प्रत्यारोपांमुळे चंद्रपूरमध्ये भाजप अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर आली असून, निवडणुकीच्या तोंडावर हा संघर्ष पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात या प्रकरणाने मोठी खळबळ उडवली असून, आता भाजप नेतृत्व यावर काय भूमिका घेते, तसेच जोरगेवार यांच्यावर झालेल्या आरोपांवर ते काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Ajay Sarkar vs MLA Kishore Jorgewar
Chandrapur Political News : काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार झालाच नाही, प्रादेशिक न्यायवैद्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या उपसंचालकांचा अहवाल प्राप्त

आमदार किशोर जोरगेवार यांनी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना विरोध करणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका घेतली होती. त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, “मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कॅम्पेन करणाऱ्या आणि सभा उधळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उमेदवारी दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. माझीही तीव्र भावना असून, जिल्हाध्यक्षांनी तसे पत्र वरिष्ठांना दिले आहे. त्यामुळे बदल अपेक्षित आहे.

- आमदार तथा निवडणूक प्रमुख तथा आमदार किशोर जोरगेवार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news