चंद्रपूर : मोहुर्ली वनपरिक्षेत्रात वयस्क वाघाचा आढळला मृतदेह

२० दिवसांपूर्वीच वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज
Chandrapur tiger death
मोहुर्ली वनपरिक्षेत्रात वयस्क वाघाचा आढळला मृतदेह
Published on
Updated on

चंद्रपूर : पंधरा ते वीस दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या एका वयस्क वाघाचा सोमवारी (दि.१४) मोहुर्ली वनपरिक्षेत्रातील नियतन क्षेत्र सितारामपेठ अंतर्गत मृतदेह आढळून आला. या वाघाचे सर्व अवयव शाबूत आहेत. विशेष म्हणजे वाघाच्या शरीराचा काही भाग आगीत जळून आला. परंतु वाघाच्या मृत्यूनंतर त्या परिसरात लागलेल्या आगीत त्याचा काही शरीर जळाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी ताडोबातील मोहर्ली वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र सितारामपेठ अंतर्गत असलेल्या भामडेळी गावालगत इरई धरण परिसरात गस्त सोमवारी सकाळी घालीत होते. दरम्यान एक वाघ वयस्क वाघ मृतावस्थेत आढळून आला. लगेच या घटनेची माहिती वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर वनविनविभागाचे अधिकारी संकेत वाठोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य धनंजय बापट, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण प्रतिनिधी सदस्य बंडू धोतरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवा, डॉ. पुरुषोत्तम कडूकर, पशु वैद्यकीय पर्यवेक्षक मिलिंद जक्कुलवार, वनपाल व क्षेत्रीय वनरक्षक यांनी घटनास्थळी जावून मौका पाहणी केली. या वाघाची ओळख पटली नसून मृत्यू हा अंदाजे १५-२० दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. या परिसरातील शेतकऱ्याने शेतात लावलेल्या आगीमध्ये इरई धरण परिसरातील गवताळ भागसुद्धा जळालेला आहे. मृत वाघाचे नखे, दात, हाडे, शाबूत असून शरीराचा काही भाग आगीमुळे अर्धवट जळाल्याचे दिसून आले आहे. आग ही वाघाच्या मृत्यूनंतर लावण्यात आलेली आहे. कारण मृत देहाच्या बाजूला मास सडल्यानंतर लागलेल्या अळ्या मुद्धा जळाल्याचे आढळून आल्या. मृतदेहाचा पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून नमुने गोळा करून उत्तरीय तपासणी करीता हैद्राबाद येथे पाठविण्यात आले आहे. त्यानंतरच वाघाच्या मृत्यूचे कारण समोर येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोहुर्ली वनपरिक्षेत्रामध्ये १६ मार्च २०२५ पर्यंत नियमितपणे T-२४ व तिचे ३ बछडे भ्रमंती करीत असल्याचे आढळून यायचे. त्यानंतर ते बछड़े २ वर्षाचे झाल्याने T-२४ या वाघिणीपासून स्वतंत्र झाले होते. तेव्हापासून वाघिण दिसून न आल्याने शोध घेणे सुरु होते. मृत वाघ हा T-24 असण्याची शक्यता असू शकते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कुशाग्र पाठक व संकेत वाठोरे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे याच्याकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news