

चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेने गस्त घालीत असताना आज सोमवारी देशी कट्ट्यासह एका आरोपीस अटक केली आहे. नरेश भीक्षपति तूरपाटी (वय 25) मुळ तेलगंणा सध्या रा.हल्ली मु. नरेंद्र नगर , जैन लेआऊट बायपास रोड चंद्रपूर असे. आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालीत असताना, आरोपी नरेश तूरपाटी याच्याकडे देशी कट्टा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्या माहितीच्या आधारे त्याचे घरून आरोपीला ताब्यात घेऊन त्यांचे घर झडती घेतली असता एक बनावटी देशी कट्टा आढळून आला. देशी कट्टा जप्त करुन आरोपीस ताब्यात घेऊन पोस्टे रामनगर येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार , पो.हवा दीपक डोंगरे ,ना.पो.का. संतोष येलपुलवार, पोका. गोपाल आतकुलवार , गोपीनाथ नरोटे यांनी ही कारवाई केली.