सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकाल तर खबरदार! चंद्रपूर पोलीसांची करडी नजर | पुढारी

सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकाल तर खबरदार! चंद्रपूर पोलीसांची करडी नजर

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ करीता आदर्श आचार संहिता सुरु असून निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर विविध राजकिय पक्षातील उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. प्रचार जोरात सुरू आहे. या काळात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सोशल मिडीयावर चंद्रपूर पोलिस करडी नजर ठेवून आहेत. आक्षेपार्ह पोस्ट टाकून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सोशल मिडीया व्हॉटसॲप, फेसबुक, टिव्टर एक्स आदी समाज माध्यमावर विविध प्रकारच्या ऑडीओ,व्हिडीओ व संदेश टाकण्यात येतात आणि त्या पोस्टवर अन्य लोक लाईक व कॉमेन्टस् करुन शेअर करतात. तसेच सोशल मिडीयावर, खोट्या बातम्या प्रसारीत करणारे ऑडीओ,व्हिडीओ व संदेश सोशल मिडीयावर वायरल होत आहे. काही व्यक्ती व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक द्वेषबुध्दीने प्रतिपक्ष उमेदवारांच्या वैयक्तिक आणि कुटूंबियांना लक्ष करुन द्विअर्थी आक्षेपार्ह पोष्ट टाकत आहेत, व अश्या पोष्ट ला इतर इसम लाईक व त्यावर आक्षेपार्ह कॉमेन्टस् करुन शेअर करीत आहे.
आदर्श आचारसंहिता दरम्यान समाज माध्यमावर टाकलेल्या आक्षेपार्ह पोष्टमुळे समाजात तेढ निर्माण करुन शांतता भंग होऊ शकते. याबाबत काही इसमाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात येवुन त्यास अटक करण्यात आलेली आहे. निवडणूक काळात या सर्व प्रकारांना आळा घालता यावा याकरीता सोशल मिडीयावर राजकीय पक्ष व उमेदवार बाबत वैयक्तिक व आक्षेपार्ह टिका टिप्पणी तसेच धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोष्ट टाकु नये आवाहन पोलिसांन केले आहे. तसेच कोणतेही व्हिडीओ, फोटो एडीट करुन आक्षेपार्ह भासवुन पोष्ट करु नयेत, किंवा त्यास लाईक व कॉमेन्टस् करुन अश्या प्रकारच्या पोष्ट शेअर करु नयेत. सोशल मिडीया व इंटरनेटच्या माध्यमातून पोष्ट करतांना सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याचे आवाहन करण्यात आले आहे.त्यानंतरही सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून तेढ निर्माणकरण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कठोर कारवाई करण्याचा इशारा चंद्रपूर पोलिसांनी दिला आहे. असे प्रकार आढळून आले तर नजीकच्या पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथील मोबाईल क्रमांक 8888511911 या क्रमांकावर माहिती देण्याचे चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाचे सोशल मिडीयाचे वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button