Chandrapur Yellow Alert : चंद्रपूर जिल्ह्यात एका चार दिवसांचा ‘येलो अलर्ट’; विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता | पुढारी

Chandrapur Yellow Alert : चंद्रपूर जिल्ह्यात एका चार दिवसांचा 'येलो अलर्ट'; विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : भारतीय हवामान खात्याने उद्या 8 ते 11 एप्रिल पर्यन्त चार दिवसांचा येलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे. विजांच्या कडकडाटासह हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि 30 ते 40 किमीच्या वेगाने हवा राहणार आहे. (Chandrapur)

चंद्रपूर जिल्ह्यात कडक उन्हाची चाहूल लागताच काल 42 अंशापर्यंत पारा चढलेला होता आज अचानक वातावरणात बदल झाला. भारतीय हवामान खात्याने आज रविवारी एका दिवसाचा अरेंजर अलर्ट तर उद्या सोमवारपासून 8 ते 11 एप्रिल पर्यन्त चार दिवसांचा येलो अलर्ट दिला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल आणि 30 ते 40 किमीच्या वेगाने हवा राहील. आज रविवारी ऑरेंज अलर्ट च्या दिवशी जिल्ह्यात काही ठिकाणी सकाळीच हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पाऊस कोसडेल अशी शक्यता होती मात्र काही वेळानंतर ढगाळ वातावरणात बदल झाला. कालपेक्षा आज दिवसभर वातावरणात चढलेला पारा खाली आला. पुढचे चार दिवस आठ ते 11 एप्रिल दरम्यान जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विजांच्या कडकडासह पाऊस कोसळेल तसेच तीस ते चाळीस किमी च्या वेगाने हवा राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत

चंद्रपूरचे तापमान -2.6 ने कमी

काल शनिवारी 42 अंश तापमानावर चढलेला पारा आज खाली आला. चंद्रपूर 39.8 असून -2.6 कमी झाला. त्यापाठोपाठ ब्रम्हपुरी 39.8 असून -1.6 ने कमी झाला. गडचिरोली 37.4 असून -3.6, गोंदिया 31.6 असून -8.4, नागपूर 32.5 असून 32.5 असून -8.1, वर्धा 34.8 असून -6.7, वाशिम 39.6 असून -1.8, अकोला 39.2असून -2.3, अमरावती 36.2 असून -4.8, बुलढाणा 36.6 असून -0.80 तापमानात घट आली आहे.

Back to top button