पुलाचे बांधकामाकरीता आम आदमी पार्टी तर्फे रास्तारोको; अर्धा तास राष्ट्रीय महामार्ग बंद | पुढारी

पुलाचे बांधकामाकरीता आम आदमी पार्टी तर्फे रास्तारोको; अर्धा तास राष्ट्रीय महामार्ग बंद

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर बल्लारशाह या राष्ट्रीय महामार्गावर अपघातोच वाढते प्रमाण लक्षात घेता अष्टभूजा बाबूपेठच्या मध्यभागी रेल्वे ओवर ब्रिजचे काम तातडीने पूर्ण करावे या मागणी करीता आज मंगळवारी आम आदमी पार्टी तर्फे अर्धातास रास्तारोको करण्यात आला. त्यामुळे मार्गावर वाहनांची गर्दी झाली होती.

शहरातून जाणाऱ्या चंद्रपूर बल्लारशाह राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. याच महामार्गांवर अष्टभुजा बाबूपेठच्या मध्यभागी रेल्वे ओवर ब्रिजचे काम टोल कंपनीला पूर्ण करायचे आहे. या मार्गावर होणाऱ्या अपघातांची जबाबदारी स्विकारून विसापूर येथील डब्लू सी बी टी आर एल कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून तात्काळ पुलाचे काम सुरू करावे या मागणी करिता आज मंगळवारी अष्टभूजा जवळील रेल्वे ओवर ब्रिज वरती चक्क अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आ ले. आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या नेतृत्वात रास्तारोको करण्यात आले. आंदोलनस्थळाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. 15 दिवसात प्रशासनाने यावर कठोर कार्यवाही केली नाही तर आम आदमी पार्टी तर्फे भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. रास्ता रोको करणाऱ्या -या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करून नंतर सोडून दिले.

यावेळी आपचे वरिष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, शहर अध्यक्ष योगेश गोखरे, किसान आघाडीचे दीपक बेरशेटीवार, जिल्हा सोशल मीडिया हेड राजेश चेडगुलवार, जिल्हा संघटन मंत्री भिवराज सोनी, जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार, शहर युवा अध्यक्ष संतोष बोपचे, जिल्हा महिला अध्यक्ष ज्योती बाबरे, महिला शहर अध्यक्षा ऍड. तब्बसूम शेख,बल्लारपूर शहर अध्यक्ष रवी पुप्पलवार, संगम सागोरे, जिल्हा युवा उपाध्यक्ष मनीष राऊत, जिल्हा युवा संघटन मंत्री अनुप तेलतुबडे, शहर उपाध्यक्ष सुनील सतभय्या, मंगला रेंभनकर, सुशांत धकाते, अक्षय गोवर्धन, सुजित चेटडगुलवार, राजू मोहुर्ले, हरिदास पिंगे, अनुज चव्हाण, गुड्डू मेश्राम, विशाल झामरे, राजू यादव उपस्थित होते.

Back to top button