चंद्रपूर : चिमूरात नगर परिषदेच्या विरोधात ‘गनिमी कावा’ आंदोलन

चंद्रपूर : चिमूरात नगर परिषदेच्या विरोधात ‘गनिमी कावा’ आंदोलन

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चिमूर नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १० काग येथील विविध न्याय मागण्या करीता नगर परिषद विरोधात आज सोमवारी (१९ फेब्रुवारी) ला सकाळी अकरावाजेपासुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीलाच रोकठोक प्रहार कामगार संघटनेच्या वतीने चिमूर तालुकाध्यक्ष अशिद मेश्राम यांचे नेतृत्वात दोन दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करण्यात आली.

काग येथील स्मशान भुमी रस्ता व शेड बांधकाम करावा, फुटलेला कोल्हापूरी बंधारा बांधावा,घरकुल योजनेचा थकीत निधी बँकेत जमा करावा, नाल्यांचा गाळ उपसा करून किटक नाशकाची फवारणी करावी, गावातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी, काग येथे पिण्याच्या पाण्यासाठी नवीन टाकीचे बांधकाम करावे,पथदिवे लावावे, पाणी पुरवठा विहिरीतील गाळ उपसा करावा इत्यादी मागण्या करीता गावकऱ्यांच्या वतीने रोखठोक प्रहार कामगार संघटना तालुका चिमूर तर्फे अनेकदा नगर परिषद,जिल्हाधिकारी तथा प्रशासणास निवेदने देण्यात आली. मात्र याकडे नगर परिषद प्रशासनाने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आज सोमवारी शिवजंयती पासुन आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करून दोन दिवसीय लाक्षणिक उपोषणास सुरुवात करण्यात आली. दोन दिवसात नगरपरिषद प्रशासनाची झोप न उघडल्यास तिसऱ्या दिवसापासुन गनिमी काव्याने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रोकठोक प्रहार कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष अशिद मेश्राम यांनी दिला आहे. लाक्षणिक उपोषणाला अशिद मेश्राम यांचेसह नानाजी मेश्राम,सुरेश परचाके,हरिचंद्र धोंगडे, प्रभुदास मेश्राम,प्रविण मेश्राम,अमोल धोंगडे, सुभाष रामटेके,पुरुषोतम मत्ते,विनोद गजभिये, किशोर मसराम,अरविंद नैताम,राजु गुडधे, श्रीकृष्ण रामटेके, प्रबुद्ध मेश्राम इत्यादी कागवासी सहभागी झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news