चंद्रपूर : मालवाहतूक रेल्वेचे इंजिन रुळावरुन घसरले, ताडाळी रेल्वे स्टेशनवरील घटना | पुढारी

चंद्रपूर : मालवाहतूक रेल्वेचे इंजिन रुळावरुन घसरले, ताडाळी रेल्वे स्टेशनवरील घटना

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा :  घुगुस येथुन औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला कोळसा घेवून जाणाऱ्या रेल्वेचा इंजिन रुळाखाली घसरल्याची घटना आज रविवारी साडेआठच्या सुमारास ताडाळी रेल्वे स्टेशन जवळ घडली. त्यामूळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

घुघुस येथुन औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला सायंकाळच्या सुमारास नियमित कोळशाचा पुरवठा केल्या जातो. हा कोळसा घुगस येथुन रेल्वे स्टेशन वरुन मालवाहतूक रेल्वेने नेल्या जातो. आज रविवारी रात्री साडेआठच्य सुमारास ताडाळी रेल्वेस्टेशन वरून वॅगन व्दारे महा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राकडे रेल्वे कोळसा घेवुन रेल्वे निघाली होती. ताडाळी रेल्वे स्टेशन जवळ मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा इंजिन रुळाखाली घसरला. त्यामूळे एकच धावपळ सुरू झाली. यामध्ये जिवीत हानी व वित्तहानी झाली नाही. परंतू काही वेळ वाहतूकोंडी झली. लगेच रेल्वे प्रशासनाने रुळाखाली घसरलेल्या रेल्वे इंजिन ला रुळावर चढवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Back to top button