70 राजुरा व 74 चिमूर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी होणार

Maharashtra assembly poll| खर्च लेखे तपासणीसाठी सादर न करणाऱ्या उमेदवारांवर होणार कारवाई
Maharashtra Assembly Election 2024
70 राजुरा व 74 चिमूर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी होणारfile photo
Published on
Updated on

चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 70- राजूरा व 74 चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च लेखा तपासणी करण्यात येणार आहे. राजुरा मतदार संघाची 8, 12 व 18 नोव्हेंबर तर 9, 13 व 19 नोव्हेंबर 2024 रोजी चिमूर मतदार संघाची तपासणी केली जाणार आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 77 मधील तरतुदीनुसार निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचे अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. 70 राजुरा मतदार संघाची प्रथम खर्च लेखा तपासणी शुक्रवार दि. 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत, द्वितीय खर्च लेखा तपासणी मंगळवार, दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत तर तृतीय खर्च लेखा तपासणी सोमवार दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृह, राजुरा येथे करण्यात येईल. 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक आदित्य बी. हे तपासणीकरीता उपस्थित राहतील.(Maharashtra assembly poll)

74 चिमूर मतदार संघात प्रथम खर्च लेखा तपासणी शनिवार दि. 9 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत, द्वितीय खर्च लेखा तपासणी बुधवार, दि. 13 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत तर तृतीय खर्च लेखा तपासणी मंगळवार दि. 19 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपकोषागार कार्यालय, चिमूर येथे करण्यात येईल. 74 – चिमूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक धर्मेंद सिंग हे खर्च तपासणीकरीता उपलब्ध राहतील.

जे उमेदवार खर्चाचे लेखे तपाासणीकरीता सादर करणार नाहीत, त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news