

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा: माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजी मोघे यांनी माना जमाती बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा आज (दि.२९) जाहीर निषेध करण्यात आला. त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आणि दहन करत निषेध करण्यात आला.
शिवाजी मोघे यांनी असंविधानिक वक्तव्य केल्याने माना जमातीमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे. आज नागपूर मार्गावर आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेचे अध्यक्ष राहुल दडमल, परिषद सदस्य यशवंत वाघ, हरिदास जांभुळे, संजय नन्नावरे, त्रिपणा दडमल यांच्या नेतृत्वात मोघे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला.
यावेळी अंकित दडमल, दिवाकर मानगूळढे, नत्थू वाघ, सुरेश मानकर, परसराम नन्नावरे, कल्पना घरत, अर्चना नन्नावरे, वनिता जांभुळे, सुनीता श्रीरामे, पौर्णिमा कापरकर, रुपाली दडमल आदीसह माना जमातीतील चंद्रपूर शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा