चंद्रपूर शहरात ट्रकमधून जनावरांची तस्करी; महामार्ग पोलिसांची कारवाई | पुढारी

चंद्रपूर शहरात ट्रकमधून जनावरांची तस्करी; महामार्ग पोलिसांची कारवाई

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प मार्गे जनावरांची अवैद्य वाहतूक करणाऱ्या एका चालकाने ट्रक रस्त्यावर ठेवून पळून गेल्यानंतर आमदार महामार्ग पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. सदर ट्रकमध्ये जनावरे कोंबून भरल्याचा आढळून आले आहे. महामार्ग पोलिसांनी समयसुचकतेने जनावरांचे जीव वाचविले आहे.
सध्या काही दलाल कवडीमोल भावाने विकत घेऊन जनावरांची मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यात येत आहे. जनावरे ट्रकांमध्ये कोंबून कोंबून भरून बाहेर पाठविल्या जात आहे. आज (दि. २१) सकाळी चंद्रपूर शहरात एका ट्रकला महामार्ग पोलिसांनी पकडला. त्यामध्ये जनावरे आढळून आले आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक मोरे, पो. कॉन्सटेबल काशिनाथ निघोट, राजेश यादव, पोना. प्रवीण बोंडे, प्रमोद पिसे गस्तीवर होते. बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे ट्रक क्र. एम. एच. 40 बिएल 0065 चा चालक ट्रक बेदरकारपणे संशयितरित्या चालवत असताना आढळून आला. महामार्ग पोलिसांनी ट्रक चालकाला थांबण्याचा प्रयत्न केला. परंतु ट्रक चालकाने ट्रक रस्त्यामध्येच सोडून पळून गेला. पोलिसांनी ट्रक झडती घेतली असता त्यामध्ये जनावरे कोंबून कोंबून भरलेले आढळून आले. अवैधरित्या जनावरांची वाहतूक करण्याच्या उदेश्याने ट्रक नेण्यात येत असल्याचे दिसून आले. या बाबत रामनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. रामनगर पोलीसांनी घटनास्थळी येऊन जनावरांनी भरलेला ट्रक ताब्यात घेतला. महामार्ग पोलिसांना संशय आल्याने ट्रक पकडल्याने जनावरांचे जीव वाचले आहे.

Back to top button