

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : बल्लारपूर शहरातील वनविकास महामंडळाच्या वसाहतीत एका बिबट्याने काही दिवसांपूर्वी एन्ट्री केली आहे. काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी वसाहतीत बिबट्याचा वावर आढळून येत असल्याने वसाहतीतील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. अद्याप वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त केला नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शनिवारी (दि. ९) रात्रीच्या सुमारास अंगणात खेळत असलेल्या अधिकाऱ्या मुलीवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु समयसुचकतेने तो हल्ला परवून लावण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
चंद्रपूर पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर बल्लारपूर शहर वसले आहे. याच शहरात बल्लारपूर शहरात वनविकास महामंडळाचे कार्यालय ओह. लागूनच एफडीसीएम वनविभागाची वसाहत आहे. या वसाहतीभोवती सुरक्षा भिंत आहे. तर काही भागात सुरक्षा भिंत नाही. तसेच हा भाग जंगलाला लागून आहे. या वसाहतीत अधिकारी कर्मचारी वास्तव्यास आहेत. सुरक्षा भिंत नसलेल्या ठिकाणावरून काही बिबटयांनी या वसाहतीत एन्ट्री केली आहे. त्याचा वावर वसाहतीत दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वसाहतीतील बिबट्याचा वावर आढळून येत असल्याने नागरिकांचे जिव धोक्यात आले आहे. वनविकास महामंडळाच्या वसाहतीतील बिबट्याचा बंदोस्त करण्यास वनविभागाला अवगत करण्यात आले. परंतु अद्याप बिबट्यांचा बंदोबस्त करण्यास वनविभाग अपयशी ठरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. वसाहत परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. रात्रीच्यावेळी अनेक बिबटे वसाहतीमध्ये आढळून येतात. तर काही ठिकाणी दिवसाही त्यांचे दर्शन होत आहे. वसाहत परिसारत जनावरे, डुक्कर, कुत्र्यांचे वास्तव्य असल्याने बिबटे शिकार शोधण्याच्या प्रयत्नात असतात. वसाहतीत नागरिक रात्री जेवनानंतर फिरायला निघत असत परंतु सध्या बिबट्याच्या दहशतीने बाहेर पडणे अशक्य होत आहे. मॉर्निंग वॉकही नागरिक दहशतीत करीत आहेत. अंगणात बसणे अथवा राहणेही नागरिकांना अडचणींचे ठरले आहे.
शनिवारी (दि. १०) वसाहतीत एका अधिकाऱ्याच्या घरी रात्रीच्या वेळी बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करण्याकरीता प्रवेश केला. त्यावेळी अधिकाऱ्याची चिमुकली मुलगी अंगणात खेळत होती. यावेळी कुत्र्यावरहल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु कुत्र्याने हल्ला परतवून लावल्याने तो वाचला. कुत्रा अंगणात असल्याने चिमुकलीचे जिव वाचले. नाही तर एका मोठ्या घटनेला वसाहतीला समोरे जावे लागले असते. कालच्याप्रसंगामुळे वसाहतीमधील अधिकारी कर्मचारी भयभीत झाले आहेत.
वसाहतीतील अधिकारी कर्मचारी यांच्या जिवाला धोका होऊ नये याकरीता सतर्क राहण्याचे आवाहन केले. वसाहतीत सावधान करणारे फलक लावले आहेत. नागरिकांना काही सुचनाही फलकाच्या माध्यमातून केल्या आहेत. सकाळी फिरावयास येनार्या नागरिकांना सतर्क करण्यात येणारे परिसरातील बिबटे असल्याने फलक लावून नागरिकांना सावधान केले आहे.वसाहतीत बिबटे वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. रात्री फिरताना टार्च व लाठी सोबत ठेवावी. लहान मुलांना एकटे सोडू नये. पहाटे सायंकाळी व रात्री एकट्याने फिरू नये. कोणत्याही प्रकारे बिबट्यांना जखमी करू नये. जखमी केल्यास बिबटे अधिक धोकादायक ठरतात आदी सुचना वनविकास महामंडळाने फलकाद्वारे अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांकरीता केल्या आहेत. चंद्रपूर शहरालगतच्या उर्जानगर व चांदा आयुध निर्माणी वसाहती मधून अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्यांना बिबट्याने उचलून नेले होते. सध्या बल्लापूर शहरातील वन विकास महामंडळाच्या वसाहतीत बिबट्याचा वावर बघता अनुचीत घटना घडण्याचा धोका वर्तविण्यत येत आहे. त्यामुळे बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी अधिकारी कर्मचारी करीत आहेत.