

चंद्रपूर : 3 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी (22 ऑगस्ट) ला 20 वर्ष कारावासची शिक्षा सुनावली आहे. सुरज प्रभाकर तुराणकर (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे.
घुग्घुूस पोलिस स्टेशन हद्दीत मागील वर्षी २०२३ मध्ये एप्रिल महिण्यात एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर आरोपीने अत्याचार केला होता. पिडीत चिमुरडीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून आरोपी सुरज प्रभाकर तुराणकर (वय ३०) विरोधात पोलीस स्टेशन घुग्घुस येथे गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रांत साखरे यांनी करून आरोपी विरुध्द सबळ साक्षपुरावे उपलब्ध करून गुन्ह्याचा तपास केला व आरोपी विरूध्द जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाबाबत अनुराग दिक्षीत यांच्या न्यायालयात आरोपी विरुध्द खटला चालविण्यात आला. जिल्हा सत्र न्यायाधिश दिक्षीत यांनी काल सबळ पुराव्याचे आधारे आरोपी सुरज प्रभाकर तुराणकर याला २० वर्ष कारावास सुनावली. याप्रकरणात सरकारतर्फे सहा. सरकारी अभियोक्ता आसिफ शेख तसेच कोर्ट पैरवी अधीकारी म्हणुन पोहवा चंपत कांबळे यांनी काम पाहिले.