चंद्रपूर : चोरटेही झाले हायटेक; कारमधून आलेल्या आरोपींनी चोरले मोबाईल

चंद्रपूर : चोरटेही झाले हायटेक; कारमधून आलेल्या आरोपींनी चोरले मोबाईल
Published on
Updated on
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : सध्या चोरटेही हायटेक होत आहेत. चोरीसाठी कारचा वापर करीत आहेत. कार मधून येऊन मोबाईल चोरी करीत आहेत. चिमूर शहरात कार मधुन येऊन मोबाईल चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना पोलीसांनी अटक केली आहे.
पोलीस सूत्रानुसार, काल (दि. १४) शुक्रवारी फिर्यादी राजू पांडुरंग नंदनवार हे चिमूर आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करीत असताना त्यांच्या शर्टाच्या वरच्या खिशात असलेला 15 हजार किमतीचा मोबाईल  सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केला.  सदर मोबाईल चोरीची त्यांनी चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून अज्ञात आरोपींविरोधात गून्हा दाखल केला. आणि सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपीचा शोध घेणे करिता तपास पथक रवाना करण्यात आले.  चिमूर शहरात हजारे पेट्रोल पंपावर चार संशयित  एम एच 40-वाय-6496 या क्रमांकाचे वाहनाने आढळून आले.  सदर वाहनाची झडती घेणे करिता वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन घेऊन उमरेड रोडनी पळ काढला. पोलीस पथकांने त्याचा पाठलाग करून सदर वाहनास न्यू राष्ट्रीय शाळेजवळ थांबवून वाहनाची झडती घेतली. त्यामध्ये फिर्यादी व्यक्तीचा  चोरीस गेलेला मोबाईल व अन्य  तीन मोबाईल हँडसेट आढळून आले. त्यामुळे आरोपी नामे धर्मेंद्र गणेश दास कुरील ( वय ५५, रा. रविदास नगर येरखडा कामठी, जि. नागपूर),  बलराम कुमार चंद्रदेव महतो (वय 20, रा. नागपूर, मूळ झारखंड) यांना अटक करण्यात आली.
आरोपींविरोधात पोलीस स्टेशन चिमूर येथे कलम 379 अन्वये कारवाई करून अटक करण्यात आली. तसेच मोबाईल चोरीसाठी वापरण्यात येणारे वाहनासह  2 लाख 95 हजाराचा माल हस्तगत करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव  यांचे मार्गदर्शनात पो.नी. गभणे यांचे नेतृत्वात पो उपनी सोरते, पोहवा विलास निमगडे, पोलीस अमलदार सचिन खामनकर, शैलेश मडावी, सचिन साठे, विनायक सरकुंडे, विशाल वाडई यांनी कारवाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news