file photo
file photo

चंद्रपूर : भरधाव ट्रकची तीन दूचाकींना धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, अन्य जखमी

Published on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : राजुरा शहरालगत असलेल्या धोपटाला पेट्रोल पंप जवळ राजुराकडून सास्तीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने मोटारसायकलचा अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील पती, पत्नी व मुलीचा मृत्यू झाला. राजुरा सास्ती मार्गावर रविवारी (दि. १३) रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

पती निलेश वैद्य (३२ वर्ष), पत्नी रुपाली वैद्य (२६ वर्ष), व मुलगी मधू वैद्य (३ वर्ष) अशी मृतकांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आज (दि. १४) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. तसेच याच अपघात भरधाव ट्रकने पुढे जावून आणखी दोन मोटरसायकलना देखील धडक दिली. यामध्ये प्रज्ञा प्रशाद टगराफ (33 वर्ष) व प्रसाद राजाबाई टगराफ (40 वर्ष) दोन्ही (रा. रामपुर) यांना धडक दिल्याने दोघेही जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोपटाळा येथील गुरुदेव नगर निवासी निलेश वैद्य हा रविवारी (दि. १३) सकाळी आपली पत्नी व मुलीसह बाहेरगावी कामानिमित्त गेले होते. सायंकाळी ते काम आटोपून घरी परत येत असताना राजुरा सास्ती मार्गावर घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील पेट्रोल पंपजवळ भीषण अपघात घडला. या अपघातात मोटारसायकलचा चक्काचूर झाला. एकाच कुटुंबातील पती निलेश वैद्य (३२ वर्ष), पत्नी रुपाली वैद्य (२६ वर्ष), व तीन वर्षाची चिमुकली मधू वैद्य यांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला.

वैद्य यांच्या मोटारसायकलला धडक दिल्यानंतर समोर जावून दोन मोटार सायकलस्वारांना देखील ट्रकने धडक दिली. यात रामपुर येथील दोघेही जखमी असून जखमींना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. नागरिकांनी ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news