चंद्रपूर : शिकारीसाठी गावात आलेला बिबट्या घुसला घरात, वनविभागाने बेशुद्ध करत घेतले ताब्यात

चंद्रपूर : शिकारीसाठी गावात आलेला बिबट्या घुसला घरात, वनविभागाने बेशुद्ध करत घेतले ताब्यात

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : सिंदेवाही तालुक्यातील कोठा गावात शिकारीता एका पडक्या घरात घुसलेला मादी बिबट्याला त्याच घरातच कोंडण्यात आले. त्यानंतर त्याला बराचवेळ रेस्क्यू करून बेशुध्द करण्यात आले. वनविभागाने बिबट्याला बेशुध्दावस्थेत ताब्यात घेतले आहे. उपचारानंतर त्याला मोकळ्या अधिवासात स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती वनविभगाने दिली आहे. दिवसभर कोठा गावात बिबट्याल बघण्याकरीता नागरिकांनी गर्दी केली होती.

सिंदेवाही मूल मार्गावरील मुरमाडी ग्रामपंचायत अंतर्गत एक छोटासा कोठा गाव जंगलाला लागून आहे. त्यामुळे या ठिकाणी वन्यप्राणी गावात येणे हे नागरिकांकरीता नवे नाही. रविवारी (दि.२६) पहाटेच्या सुमारास एका बिबट्याने शिकारीच्या उदेश्याने कोठा (तालुका सिंदेवाही) गावात प्रवेश केला. पहाटेच्या सुमारास शिकारीचा प्रयत्न झाला प्रयत्न त्यात तो अयस्वी झाल्याने अंबादास चिरकुटा श्रीरामे यांचे जुन्या पडक्या घरी घुसलेला बिबट्या (मादी) त्याच घरात दडून राहिला. सकाळी तो त्या व्यक्तीला घरात आढळून आला. तत्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी, सिंदेवाही (प्रादे) यांना माहिती देण्यात आली. त्यांचे अधिनिस्त कर्मचारी व अतिशिघ्र दल सिंदेवाही (RRU) यांनी घटनास्थळ गाठले.

ज्या जुन्या पडक्या घरात बिबट घुसला होता त्या ठिकाणावरून तो पळू नये बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील अधिनिस्त कर्मचारी व आरआरयु चमुने सकाळ पासून तर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत शर्तीचे प्रयत्न करून त्या घरातील एका रूम मध्ये बंद कोंढले. त्यानतर जेरबंद करण्याकरीता ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. रविकांत खोब्रागडे, सशस्त्र पोलीस दल अजय मराठे यांना पाचारण करण्यात आले. दुपारी तिनच्या सुमारास बिबट (मादी)वर अचुक निशाना साधून डार्ट करण्यात आले. बिबट (मादी) बेशुध्द झाल्यानंतर साडेतीनच्या सुमारास पिंज-यात सुरक्षितरित्या बंदीस्त केले.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news