कार-रिक्षा अपघातात दोन महिला मजूर ठार; कारचालकावर गुन्हा

लोणार : शेतमजुरांची वाहतूक करताना भीषण अपघात
buldhana news
कार-रिक्षा अपघातात दोन महिला मजूर ठार; कारचालकावर गुन्हाfile photo
Published on
Updated on

Two female laborers were killed in a car-rickshaw accident; a case has been registered against the car driver

लोणार, पुढारी वृत्तसेवा : बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव जट्टू येथील महिला मजूरांना सकाळी तीनचाकी अँटो रिक्षामधून घेउन शेतकऱ्याच्या शेतात कामासाठी जात असताना रविवार (१) रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास कार व रिक्षाचा भिषण अपघात झाला. सरस्वतीमातमळ गावाला जोडणाऱ्या जोड रस्त्यावर झालेल्या या अपघातात दोन महिला मजुर ठार झाल्या.

किनगाव जड्ड येथील मजुर महिलांना हिवराखंड येथे शेतात कामासाठी घेउन जाणाऱ्या अॅटो रिक्षाला मारोती कार (क्र एमएच ४३ ५८२१) कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात अॅटोमधील जरीनाबी आयुब शाहा (५३) व रंजना परमेश्वर कासतोडे (वय ५३) या दोन महिलांचा मृत्यु झाला.

अपघातात रिक्षामधील ड दमदाडे, अलका न शेवाळे, राधाबाई कल्पना विठ्ठल मधुकर गजू गायकवाड, लक्ष्मी बबन करवंदे, शांताबाई परशराम शेळके, चंद्रभागाबाई जगन नागरे, रंजना परमेशवर कासतोडे व अॅटो चालक अतिक निसार शाहा (सर्व राहणार किनगाव जट्ट) हे गंभीर जखमी झाले. अॅटोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

कारच्या धडकेनंतर अँटो रस्त्याच्या कडेला उलटला. अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर काही क्षणातच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी महिलांना रुग्णवाहिकेद्वारे लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news