Buldhana Crime : बुलढाण्यातीला 'त्या' खुनाचा आरोपी अखेर जेरबंद

गणपतीच्या वादातून झाली होती एकाची हत्या; महिलेसह तीन आरोपी गजाआड
Buldhana Crime
गणेश मंडळाला वर्गणी न दिल्याचे कारणावरून पवार यांना आरती करण्यास मनाई केली. यानंतर झालेल्या वादात पवार यांना चाकूने भोकसून हत्या केली.Pudhari News Network
Published on: 
Updated on: 

बुलढाणा : गणेशोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत असतांना देऊळगाव राजा शहरात मात्र विघ्न उद्भवले. गणेश मंडळाला वर्गणी न दिल्याचे कारणावरून पवार यांना आरती करण्यास मनाई केली. यानंतर तिघांनी पवार यांना मारहाण केली. एवढ्यावर न थांबता एकाने पवार यांना चाकूने भोसकून हत्या केली. याप्रकरणी देऊळगावराजा पोलिसांनी एका महिलेसह तीन आरोपींना गजाआड केले आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगावराजा शहरातील शिवाजीनगर भागात पुर्वमुखी गणेश मंडळात मंगळवार (दि. १०) रात्री ८.३० च्या सुमारास बाळू उर्फ परमेश्वर दत्तात्रय पवार यांच्याशी अंकूश हरिभाऊ घोंगे (वय ३५), सौ.कविता अंकूश घोंगे (वय ३२), शिवाजी विठ्ठल घोंगे (वय ६२) या तीघांनी वाद घातला. "तू गणपतीची वर्गणी दिली नसल्याने तुला आरतीचा मान नाही" असे म्हणत पवार यांना जबर मारहाण केली. त्याचवेळी अंकूश घोंगेने बाळू पवार यांच्या पोटावर चाकूने सपासप वार केले.

Buldhana Crime
फडणवीस म्हणाले, खडसेंविषयी गणेश उत्सवानंतर निर्णय!

यानंतर अत्यवस्थ झालेल्या बाळू पवार यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान,बाळू पवार यांचा मृत्यू झाला. याप्रकरणात देऊळगाव राजा पोलिसांनी शिवाजी घोंगे व कविता घोंगे या दोन आरोपींना तात्काळ अटक केली. मात्र, मुख्य आरोपी अंकुश घोंगे हा फरार झाला होता. त्याला सिंदखेडराजा मार्गावरील जिनिंगजवळ आज (दि.१४) पोलीसांनी अटक केली आहे.

Buldhana Crime
पूर्णा येथे महिलेचा निर्घृण खून; विजयनगरजवळ मृतदेह फेकला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news