

Sharad Rakhonde Full Ironman
बुलढाणा : गुर्ये, साऊथ कोरिया येथे नुकत्याच झालेल्या जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या 'फुल आयर्न मॅन ट्रिथलान' (३.८ किमी पोहणे,१८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी मॅरेथॉन) स्पर्धेत बुलडाणा वकील संघाचे सदस्य, साहसी खेळाडू ॲड. शरद राखोंडे यांनी सहभाग घेत १४ तास ३८ मिनिटांत ही कठिण स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.
ही स्पर्धा जगातील अवघड व साहसी स्पर्धांपैकी एक स्पर्धा असून यात भाग घेण्यासाठी जगभरातून स्पर्धक येत असतात. अॅड. शरद राखोंडे हे बुलढाणा जिल्ह्यातील पहिले 'फुल्ल आयर्न मॅन ठरले असून जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात गौरवाने झळकले आहे.