बुलढाणा : दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

Buldhana Theft News | पोलिसांनी २३ दुचाकी केल्या हस्तगत
Buldhana Theft News |
बुलढाणा येथे पोलिसांनी दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद केली.Pudhari Photo
Published on
Updated on

बुलढाणा : गर्दीच्या ठिकाणांहून अनेक दुचाकी चोरून त्यांची विक्री करणा-या चार सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि खामगाव शहर पोलिसांनी गजाआड केले. खामगाव शहरातून ५ ऑक्टोबर रोजी चोरीला गेलेल्या एका दुचाकीचा तपास करताना पोलीसांना चार चोरटे हाती लागले. या टोळीने अलिकडच्या काळात बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, जळगाव, हिंगोली या सात जिल्ह्यांतून एकूण 9 लाख रूपयांच्या २३ दुचाकी चोरून त्यांची विक्री केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले.

Buldhana Theft News |
Pune Theft News : दीडशे घरफोड्या करणारी टोळी जाळ्यात

मुख्य संशयित विशाल दुर्योधन इंगळे (वय २४,रा. अकोला) हा बसस्थानक,कोर्ट परिसर,आठवडी बाजारात पार्किंग केलेल्या दुचाकी सराईतपणे चोरून लंपास करीत होता. तसेच अंकित प्रमोद मुलनकर (वय२५), विकास बबन मोरे (वय. ३१ रा.भेंडीकाजी ता.बार्शिटाकळी जि.अकोला) आणि सिध्दार्थ श्रावण खरात (वय ३८,रा.माहादापूर ता.माहूर जि.नांदेड) हे त्याचे तीन साथीदार ग्राहक शोधून चोरीच्या दुचाकींची विक्री करायचे. पोलिसांनी या घटनेचे गुढ शोधताना पोलिसांना सी.सी.टी.व्ही.मध्ये मुख्य संशयित विशाल इंगळे या दुचाकी चोरट्याने सर्वच गुन्ह्यात एकाच रंगाचे कपडे परिधान केल्याचे दिसून आले. यामुळे ही चौघांची टोळी अलगद अडकली.

या तपासादरम्यान, बुलढाणा व जळगाव जिल्ह्यातील प्रत्येकी सात, नागपूर जिल्ह्यातील चार, वर्धा जिल्ह्यातून दोन आणि वाशिम, अमरावती, हिंगोली या जिल्ह्यांतील प्रत्येकी एक अशा २३ गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी 9 लाखांच्या चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या. मुख्य संशयित विशाल इंगळे याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. सर्व संशयित आरोपी खामगाव शहर पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या तपास पथकाने दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news